प्रश्न क्र.२ माझी सायकल शिकताना झालेली गंमत/फजिती' या विषयावर तुझा अनुभव सांगा.
Answers
Answer:
प्रश्न क्र.२ माझी सायकल शिकताना झालेली गंमत/फजिती' या विषयावर तुझा अनुभव सांगा.
Answer:
मी जेव्हा आठवीत गेलो तेव्हा माझ्या बाबांनी मला सायकल घेऊन दिली. माझ्या सर्व मित्रांकडे सायकली होत्या त्यामुळे मला सायकली बद्दल खूप आकर्षण वाटत होते आणि आता स्वतःची सायकल म्हटल्यावर माझा आनंद द्विगुणित झाला. मात्र आता समस्या अशी होती की सायकल शिकवेल कोण? परंतु माझ्या समस्येचे उत्तर माझ्या बाबांनी दिले कारण त्यांनी ठरवले होते की तेच मला सायकल शिकवतील.
रविवार आला आणि बाबांना त्यांच्या कार्यालयातून सुट्टी मिळाली माझ्या मनात देखील खूप कुतूहल होते कि मी आज सायकल शिकणार. बाबा आणि मी मोकळ्या मैदानात गेलो व त्यांनी मला सायकलवर कसे बसावे ते शिकवले. या अगोदर देखील मी मित्रांसोबत सायकलवर बसलो होतो परंतु स्वतः सायकल चालवणे आणि मित्रांच्या बरोबर बसणे यांच्यात फरक असतो हे त्या दिवशी मला समजले.
बाबा मला सायकल वरती कसे बसावे व सायकल कशी चालवण्याचे धडे देत होते. सुरुवातीला जसे मी सायकल चालवायला लागलो बाबांनी हळूच त्यांचा हात मागून सोडून दिला व माझा तोल गेल्याने मी जोरात खाली पडलो. मी खाली आणि सायकल माझ्यावर. मला खूप जोराचे लागले होते परंतु असे असले तरी मी सायकल शिकणारच असे ठरवले होते.
पुन्हा बाबांनी मला उठवले आणि सायकल चालवायला मदत करू लागले. मी कसा बसा सायकल चालू लागलो. बाबा मला हिम्मत देत होते आणि माझा आत्मविश्वास वाढवत होते. पुन्हा मी माझी सायकल समोरच्या स्त्रीला जोरात लागली. मला आजही आठवते त्या मावशीने मला खूप जोरात रागावले होते.
बाबा माझ्याजवळ येऊन मला म्हणाले सायकल शिकायची असेल तर या गोष्टी सहन कराव्याच लागतील. मी पुन्हा नव्या जोमाने सायकल चालवू लागलो. बाबांच्या मदतीने व मदतीविना हळूहळू माझा सायकल चालवण्याचा सराव सुरू झाला आणि काही दिवसांनी मी स्वतः सायकल चालवू लागलो.
खरचं सायकल शिकणे हा माझ्या आयुष्यातील अतिशय छान व गमतीदार प्रसंग होता.