प्रश्न-४ न्यायालयांचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा
Answers
Answer:
दोन पक्षकारांतील तंट्याचा त्रयस्थाकडून निवाडा करण्यासाठी उभारलेली संघटना किंवा यंत्रणा म्हणजे न्यायसंस्था होय. दोन व्यक्तींमधील तंटा जेव्हा निर्णयासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे जातो, तेव्हा न्यायसंस्था अस्तित्वात येते. अगदी प्राचीन काली जेव्हा दोन व्यक्तींत किंवा गटांत तंटे होत असत, तेव्हा त्या तंट्यांचा निवाडा त्या व्यक्ती किंवा ते गट स्वतःच्या बाहुबलावर करीत असत. न्यायसंस्था ही त्याच्या पुढची पायरी असून मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. (१) दोन पक्षकार (२) त्यांचा तंटा (३) तंट्याचा निवाडा करणारी तिऱ्हाईत व्यक्ती, ह्या तीन गोष्टी न्यायसंस्थेचे अनिवार्य घटक होत. हे घटक सार्वत्रिक असून प्रत्येक न्यायसंस्थेत आढळतात. त्यांच्याशिवाय न्यायसंस्था अस्तित्वात येत नाही. न्यायसंस्थेची प्रमुख शक्ती जनमानसात तिला असलेली आदरभावना हीच होय. वरवर पाहता जरी न्यायखात्याच्या आदेशांना शासनाच्या शक्तीचाच आधार आहे, असे आपणास भासले; तरी त्या आदेशांची कार्यवाही करण्याची सक्ती शासनाला वाटते ह्याचे कारण तसे न केल्यास, ते शासन आपले सामाजिक व नैतिक अधिष्ठान व प्रामाण्य गमावून बसेल, ही भीती होय. केव्हाकेव्हा निवाडा करण्यासाठी कायद्याची गरज असतेच असे नाही. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या एका तंट्यापुरता निकालही दिला जाऊ शकतो;