Social Sciences, asked by pratik2235, 1 year ago

प्रदुषण एक समस्या भाषण लवकर सांगा ​

Answers

Answered by hayzelfountes40
2

Answer:

प्रदूषण हा आज मानव जीवनात एक गंभीर समस्यांचा विषय आहे. मागील काही वर्षांर्पासून प्रदूषण ज्या गतीने वाढत चाललेला आहे की त्यामुळे सर्व जीवांना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. प्रदूषण म्हणजे नेमक  तरी काय?

प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -

पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी  - जेव्‍हां काही विषारी पदार्थ नद्या, समुद्र, तलाव, आणि इतर जलाशयांमध्‍ये प्रवेश करतात तेव्‍हां ते पाण्‍यामध्‍ये विरघळून जातात अथवा तळाशी जाऊन सडतात, कुजतात किंवा पाण्‍यावरच अवक्षेपित होतात. आणि यामुळे पाणी अशुद्ध होते आणि जलप्रदूषण होते त्यामुळे जलपर्यावरण प्रणालींवर दुष्‍परिणाम होतो. प्रदूषक पदार्थ तळाशी जाऊन, जमिनीखाली जाऊन बसू शकतात आणि ह्यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्‍परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषण फक्‍त मानवांसाठीच नव्‍हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्‍यांसाठीही विनाशकारी आहे. प्रदूषित पाणी हे पिण्‍यासाठी, त्यात खेळण्‍यासाठी, शेती आणि उद्योगासाठी देखील अयोग्‍य आहे. ह्याच्‍यामुळे सरोवरे आणि नद्यांच्‍या सौंदर्यात्‍मक गुणवत्ता नष्ट होते.

वायू प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा  - वायू प्रदूषण म्‍हणजे वातावरणात घातक दूषित पदार्थ मिश्रित होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. वायू प्रदूषणामुळे हवामानात देखील बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत.  

ध्वनिप्रदूषण म्हणजे मोठा आवाज - नको असलेला, खूप जोराचा आवाज म्‍हणजेच ध्‍वनि प्रदूषण. ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. वर्ल्‍ड

हेल्‍थ

ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन ४५ डेसिबल असल्‍याचे निश्चित केलेले आहे आणि ९० डेसिबलपेक्षा जास्‍त

जोराच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो.  

ध्‍वनिप्रदूषणामुळे फक्‍त चिडचिडपणा किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. आणि  ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी देखील वाढते, ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त आवाजामुळे तंत्रिका रोग (न्‍यूरोसिस) आणि नर्व्‍हस ब्रेक डाउन (तंत्रिका अवरोध) देखील होण्याची शक्यता असते, असे तज्ञांचे मत आहे.

प्रदूषणच्या भंयकर संकटातून सुटका करण्याकरीता मनुष्यास काही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम कधीही सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नका. रासायनिक खतांच्‍या ऐवजी जैविक खतांचा वापर,पॉलिथिनच्‍या ऐवजी कागदाचा वापर, पॉलिएस्‍टरच्‍या ऐवजी कॉटन, ज्‍यूटचा वापर करण्‍याकडे कल ठेवा. जास्तीतजास्‍त

झाडे लावा. तुमच्‍या टीव्‍ही आणि म्‍युझिक सिस्‍टमचा आवाज कमी ठेवा. गाडीचा हॉर्न क्‍वचितच वाजवा. लाउडस्‍पीकरचा वापर करण्यास प्रोत्‍साहन देऊ नका. लग्‍नाच्‍या वरातीत बॅन्‍ड

व फटाक्‍यांचा वापर करू नका. घरे, फॅक्‍टरी, वाहने यांपासून निघणार्‍या उत्‍सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा.  

सामान्‍यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. आणि या हानिकारक समस्येतून मनुष्यच स्वतःची सुटका करू शकतो. सर्व मिळून प्रण घ्या की आपण प्रत्येक जण प्रदूषण संपवण्याचा प्रयत्न नक्की करणार.

Similar questions