Political Science, asked by santoshtransport6140, 3 months ago

पुस्तकाचे भव्य प्रदर्शन । यावर जाहिरात तयार करा​

Answers

Answered by Sauron
26

उत्तर :

जाहिरात लेखन :

खुशखबर ! खुशखबर !! खुशखबर!!!

पुस्तकाने ज्ञान वाढते, ज्ञानाचा झरा घरोघरी पोहोचविण्याचे पुण्यदायी काम करण्याची संधी आम्हास मिळत आहे. आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.

आम्ही आपल्या शहरात घेऊन येत आहोत 'ज्ञानवर्धिनी भव्य पुस्तक प्रदर्शन'

• लहानांपासून मोठ्यांसाठी सर्व उपयोगी पुस्तके

• 5000 हून अधिक पुस्तकांची उपलब्धता

• लहान व मोठ्यांसाठी वेगवेगळी स्वतंत्र कक्ष

• अनेक भाषांमधील पुस्तके उपलब्ध असतील

• साहित्यिक मनोरंजन तसेच गमतीजमती साठी कोडी यांची पुस्तके

• खवय्यांसाठी तसेच सुगृहिणीसाठी विविध शेफ यांची पाककृतीचे पुस्तके

• लहान मुलांसाठी गोष्टी, विज्ञान, गमती जमती, खेळाची माहिती देणारे सामान्य ज्ञान यांची पुस्तके असतील

• इच्छुकांसाठी मेहंदी तसेच रांगोळी यांच्या नक्षीकामाची पुस्तके

★ प्रदर्शनामध्ये पुस्तक विक्री सुद्धा होईल

एका पुस्तकावर 10% तर दोन पुस्तकावर 30% सवलत देण्यात येईल

प्रवेश - विनामूल्य

दिनांक - 15 मार्च - 17 मार्च, 2021

स्थळ : बालगंधर्व रंग मंदिर, पेशवा बाजीराव मार्ग, पुणे - 27

Similar questions