‘पुस्तकाांची काळजी घेणे आवश्यक आहे’ याविषयी तुमचे मत लिहा .
Answers
पुस्तकं स्वच्छ हातांनी हाताळावीत.
शक्यतो पुस्तक वाचातांना / हाताळतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.
खुणेसाठी पानं कोपर्यात दुमडण्याऐवजी पुस्तकखुणा (बुकमार्क्स) वापरावेत.
नविन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टीक अथवा कागदी कव्हर घालावं.
पुस्तकांचं कपाटं सूर्यप्रकाश थेट पुस्तकांवर पडेल अशा ठिकाणी नसावं.
पुस्तकं अधून मधून हाताळत रहावी.
पुस्तकांच्या कापाटात पुस्तक लावतांना खूप गर्दी करुन लावू नयेत. पुस्तकाच्या कपाटाची वेळोवेळी साफसफाई करावी.
पुस्तकं शक्यतो उभी लावावीत. एकाच उंचीची, आकाराची पुस्तक जवळजवळ लावावीत.
पुस्तक लावताना विषयानुरूप वा लेखक/लेखिकेच्या नावानुसार लावावीत.कमीतकमी हाताळली जातात.ठेवताना सोयीचे होते.
बुकशेल्फमध्ये चंदनाची काडी, लवंग ठेवावेत.
दर तीन - चार महिन्यांनी पुस्तकांना ऊन दाखवावे.
पुस्तकं सतत शेल्फफमधून काढून ती जागा पुसून घ्यावी.
पुस्तकाच्या कपाटात डांबर गोळ्या ठेवाव्यात.
बकुळीचे सुकलेले गजरे.वेखंडाचे तुकडे पुस्तकांचे वाळवीपासून संरक्षण करतात.
पुस्तकाचे कपाट पातीचहाच्या तेलाच्या बोळ्याने पुसून काढावे.त्यानेही पुस्तके चांगली रहातात.
पुस्तके ठेवण्याआधी कपाटात.फळीवर वर्तमानपत्र पसरावे.
लहान मुलांची पुस्तक त्यांना काढता येतील अशा जागी ठेवावीत.
पुस्तकांवर क्रमांक टाकुन एक यादी केल्यास त्याप्रमाणे पुस्तक शोधायला सोपे जाते.
पुस्तकांचे शेल्फ शक्यतो बंद काचेचे असावे. धूळ कमी बसते आणि पुस्तकं नीट दिसतात.
पुस्तकावर खुणा,चित्र रंगवणे,रेघा मारणे टाळावे.पुस्तकाचे सौंदर्य नष्ट होते.
पुस्तकावर सुवाच्य अक्षरात नाव व तारीख टाकावी. जास्त मजकूर लिहून पुस्तक खराब दिसायची शक्यता असते.
दुसर्या व्यक्तीस पुस्तक वाचायला दिल्यास तशी नोंद करुन ठेवावी.
पुस्तक पाणी वा इतर काही सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवावे. फडक्याने पुसायचा प्रयत्न करू नये.पुस्तक आधिक खराब होते.
पुस्तक पाणी वा इतर काही सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवल्यानंतर त्या पानांवरुन मध्यम गरम इस्त्री फिरवावी.
लहान मुलांची पुस्तक कितीही काळजीपूर्वक हाताळली तरी थोडीफार फाटतातच. अशावेळेस घरात 'बुक अँब्युलन्स' म्हणून एखादं छोटंसं बास्केट अथवा खोका ठेवता येईल. त्यात अशी फाटलेली पुस्तकं मुलांना एकत्र करायला सांगून फावल्या वेळात पुस्तकांची डागडूजी करायला शिकवता येऊ शकेल. या 'बुक अँब्युलन्स' मधे रिपेयरिंगसाठी लागनारं सामान जसं - गोंद, सेलोटेप, कात्री, स्टेपलर, सुई-दोरा अशा वस्तू 'पुस्तकांची प्रथमोपचार पेटी ' म्हणून ठेवता येतील.
वाचनालयातून आणलेलं पुस्तक आपल्या हातून फाटलं तर त्याची डागडुजी घरी करु नये. वाचनालयात पुस्तकांची डागडुजी करण्याकरीता खास सोय असते.
पुस्तक उघडून उपडं ठेऊ नये. अशाने पुस्तक जिथे सांधलं गेलेलं असतं (क्रिझ) त्याठिकाणी खराब होऊ शकतं. जर पुस्तकाचा या भागाचं फार नुकसान झालेलं असेल तर तो पूर्णपणे काढून टाकून पुस्तक नव्याने सांधावं लागतं.
plz mark as brilliant and like this ans