India Languages, asked by sr4920682, 17 hours ago

पुस्तकाकडे केवळ कागदांवर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो. त्यांना स्वत:चं व्यक्तिमत्त्व असतं. पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची; संवाद साधण्याची! एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं, की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं. परमेश्वरानं आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे; पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकंच देऊ शकतात. शिवकथा वाचायला लागलो, की त्यांच्या शब्दाशब्दांतून इतिहास जिवंत होतो. जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूपं पाहत पशुपक्षी, प्राण्यांशी संवाद साधतो, विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो, तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभांडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतंच आणि जाणिवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून, तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्त्वे केवळ पुस्तकेच देतात म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो. त्याच्याशी नातं जोडायलाच हवं.

वरील उतऱ्याला योग्य शीर्षक द्या.​

Answers

Answered by 111KING111
2

Answer:

1. पुस्तक एक जादुई जग

2. पुस्तकी जगाची सफर

3.पुस्तकाचे फायदे ।

4. पुस्तकाची भावना

Answered by rameshwarechaurasiya
0

Answer:

saransh lekhan

Explanation:

saransh lekhan

Similar questions