पाठाबाहेरील उदाहरणे शोधून खालील कृती करा
शब्द अनेक
व्युत्पत्ती कोश
अर्थ एक
अर्थ अनेक
उदा. जलनारतीय पाणी
उदा. पान-झाडाचे (पर्ण) पान (पृष्ठ) पुस्तकाचे पान,
Answers
मराठीमध्यें विशेष करून संस्कृत, देशी,अरबी, फारसी ह्या भाषांचे शब्द आढळतात; आणि हिंदी, गुजराती, तेलुगू, कानडी व इंग्लिश या भाषांचे शब्दही बरेच आलेले आहेत.मराठी संस्कृतोत्पन्न असल्यामुळें व संस्कृतांत नवीन शब्द बनविण्याला उपसर्ग,प्रत्यय,धातु व समास यांमुळे फारच मदत होत असल्यामुळें त्यायोगे संस्कृत शब्द बनतात. अशा प्रकारें बनलेले पुष्कळच संस्कृत शब्द मराठींत जसेच्या कांही फरक ने होता टिकून राहिले आहेत; आणि तसे ठेवण्याची मराठीची प्रवृत्तीही अजून जोरात आहे. अशा संस्कृत शब्दांना "तत्सम" शब्द असे म्हणतात. उदा>-देव, माता, पिता, कवि, गुरु, शत्रु, मित्र, इ.
"तद्भव" शब्द संपादन करा
जे शब्द संस्कृत श्ब्दांच्या मूळ रूपात फरक होऊन मराठींत आलेले आहेत, त्यास "तद्भव" शब्द असे म्हणतात उदा.- घर (गृह), हात (हस्त), पाय (पाद), कान (कर्ण), पान (पर्ण), काटा (कंटक), इ.
"देशी" शब्द संपादन करा
मराठींत असे काही शब्द आहेत कीं, ते तत्सम, तद्भव, यवनी वगैरे नसून कोठून उत्पन्न झाले असावे हे काहीच सांगतां येत नाहीं. ते मूळचेच येथल्या पूर्वीच्या महाराष्ट्रांत वसती करून राहिलेल्या लोकांचे असावे आणि ते आपल्या मराठींत दृढमूल झाले असावे, असे दिसते; अशा शब्दांना "देशी" शब्द असें म्हणतात. उदा.- झाड, धकटा, लेकरू, इ.
[टीप- मराठी, गुजराती, हिंदी, बांगला, इ. देशांत सध्यां चालू असलेल्या भाषांनाही देशीभाषा किंवा देशभाषा असें म्हणतात; पण त्या अर्थाने येथे देशी हा शब्द वापरला नसून महाराष्ट्रांत मूळ राहणाऱ्या लोकांचे जे शब्द मराठींत जसेच्या तसे शिल्लक उरले आहेत, ते 'देशी' शब्द, ह्या अर्थानेंच हेमचंद्र वगैरे पूर्वव्याकरणकार तो शब्द वापरतात, तसा येथें वापरला आहे.]
here is the answer ☝☝