(२) पाठाच्या आधारे टिपा लिहा
Answers
Answer:
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वीरांगना"" या पाठातील आहे. या पाठात रेखाजींच्या देशभक्तीपर केलेल्या कार्याचे वर्णन केले आहे.
★ टिपा लिहा.
(अ) मुले भरकटण्याची कारणे.
उत्तर- समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे समाजातील काही समाजकंटक मुलांना फसवतात आणि पळवून नेतात. घरात आई-वडिलांशी भांडण करून काही मुले घराबाहेर पडतात. झगमगत्या दुनियेला बाली पडून काही मुले घर सोडून निघून जातात. अशा अनेक कारणांनी मुले भरकटतात.
(आ) रेखाजींच्या कार्याचा परिणाम
उत्तर- राष्ट्राला एक संतुलित वळणावर आणण्याचे कार्य रेखाजींनी केले. हल्ली समाजमाध्यमांचा प्रभाव जास्त वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम ही आढळून येतात. त्या माध्यमांच्याद्वारे फसवलेल्या मुलामुलींना समजावून सांगणे कठिण असते. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात, भविष्यकाळाची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करतात. ही मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील होतात. अशा पद्धतीने देशाचे भवितव्य घडवण्याचे कार्य रेखाजी करतात.
धन्यवाद...
"
Explanation: