पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
Answers
अरुणा ढेरे यांचा 'वाट पाहताना' हा अत्यंत हृदय ललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात 'नंतर काय होईल?', 'माझ्या स्वप्नांप्रमाणे, कल्पनेप्रमाणे घडेल ना?' अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला, जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे.
सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत. अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकांचे मन हळवे, कोमल होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितिशीलता जागृत होते. आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते. या सर्वांत जगण्याचाच अनुभव होता. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी, तसेच शेतकरी, वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यांवर लेखिकांना गवसतात. अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात. म्हणून 'वाट पाहताना' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.
Mark as brainliest
Answer:
अरुणा ढेरे यांचा 'वाट पाहताना' हा अत्यंत हृदय ललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात 'नंतर काय होईल?', 'माझ्या स्वप्नांप्रमाणे, कल्पनेप्रमाणे घडेल ना?' अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला, जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे.
सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत. अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकांचे मन हळवे, कोमल होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितिशीलता जागृत होते. आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता x