PageN
मोरू कोल्याचे पोर- बापाची समुद्रकिनारी वाट पाहणे - समूदायी
कपा- देशनवालाच आधन - कदाग पूजा करून कृतज्ञता
व्यक्त- समुद्रात हरवलेली बाप होडक्यात दिसने-
सागराची बापाशी गळाभेट
Answers
Answer:
सागरमाया
Explanation:
गेल्या तीन दिवसांपासून मोरू कोळ्याचा पोर सागर हा अन्नपाण्याशिवाय समुद्रकिनारी बसून होता. त्याच्या डोळ्यांतलं पाणी आटत नव्हतं; गळ्यात सारखा हुंदका दाटत होता. समोर पसरलेल्या समुद्राच्या लाटांकडे तो आशाळभूतपणे पाहत होता. जरा जरी पाण्यावर कुठं काही दिसलं, तरी सागराला वाटायचे आला आपला बापूस आला.
थोडा वेळ गेला की सागर निराश व्हायचा. कुठंतरी एखादी मोटरबोट दिसायची. पाण्यात मजा करणारे लोक दिसायचे. डोळ्यांत प्राण आणून बसलेल्या बापाचे जहाज मात्र दिसत नव्हते.
दुपारी सागराची आई सागराला घरी न्यायला आली होती. पण सागर तिथून अजिबात हलला नाही.
समुद्राच्या लाटा अन् मोरू कोळ्याचे अनेक वर्षांचं नातं होतं. मोरू कोळ्याचा तिसरी पिढी आणि सागरची चौथी पिढी समुद्राच्या कृपेने भाजी - भाकरी खात होती.
रोज होडके घ्यायचे. निळ्या लाटेवर स्वार व्हायचे. खोल पाण्यात जायचे, हा सागराच्या वडिलांचा परिपाठ होता.
गेले काही दिवस सारे कसे छान चालले होते. नारळी पुनवेला मोरू आणि सागर यांनी समुद्राची पूजा केली होती. त्याला नारळ अर्पण केला होता.
" हे सागरराजा... तुझ्या कृपेने आम्हांला खाऊ दे, पिऊ दे, तुझ्या लाटांवर आनंदानं नाचू दे, खेळू दे," अशी बापलेकाने प्रार्थना केली होती. अन् गेल्या तीन दिवसांपासून मोरूचे होडके दिसेनासे झाले होते. सागर रडून रडून हैराण झाला होता.
थोड्या वेळाने त्याचे डोळे चमकले. एका मोठ्या बोटीला बांधलेले होडके त्याला दिसले. सगळा गाव किनार्यावर गोळा झाला. मोरू कोळी त्या होडीवर बसलेला होता.
सागरला बापूस मिळाला. आणि बापलेकाची गळाभेट झाली. सारा गाव ते दृश्य पाहून हेलावला.