Hindi, asked by gangadharjadhav9252, 8 months ago

पहिल्या महायुद्धाचे कारण​

Answers

Answered by abhi8190
0

Answer:

जागतिक स्वरूपाचे हे पहिले महायुध्द १ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपले. आधुनिक काळातील युध्दांची कारणपरंपरा प्रदीर्घ असते मात्र ते एखाद्या विवक्षीत घटनेमुळे भडकते. पहिल्या महायुध्दाची कारणपरंपरा संक्षेपाने पुढीलप्रमाणे होती : या युध्दाची ठिणगी जरी ऑस्ट्रिया−हंगेरी साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंड याच्या खुनाने पडली तरी खरा संघर्ष जर्मनी व शेष यूरोप यांच्यातच होता. १८७० पर्यंत जर्मनीत अनेक स्वतंत्र संस्थाने होती तथापि जनतेमध्ये एकराष्ट्रीयत्वाची तीव्र भावनादेखील होती. १८७०-७१ ह्या ⇨फ्रँको-प्रशियन (जर्मंन) युध्दानंतर प्रशियाचा पंतप्रधान बिस्मार्क याने ऑस्ट्रिया सोडून इतर जर्मन संस्थानांचे एकत्रीकरण बनविण्यात यश मिळविले. त्याने प्रशियाच्या राजाच्या नेतृत्वाखाली आधुनिक जर्मनीची स्थापना केली व प्रशियाचा राजा हा जर्मनीचा बादशहा ऊर्फ कैसर बनला. जर्मन राष्ट्राच्या निर्मितीने ब्रिटन, फ्रान्स व रशिया यांना एक बलवान प्रतिस्पर्धी निर्माण होऊन यूरोपातील बलसमतोल अस्थिर झाला. जर्मनीलाही साम्राज्य-विस्तार करण्याची महत्त्वकांक्षा होतीच पण जर्मनीच्या निर्मितीपूर्वीच आफ्रिका व आशिया यांचा बराच भूभाग वरील तिघांनी बळकावलेला होता. जर्मनीनेही त्यांच्या मागोमाग आफ्रिकेतील काही प्रदेश, चीनमधील काही बंदरांत इतर यूरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रांच्या धर्तीवर विशेषाधिकार व पॅसिफिक महासागरातील काही बेटे मिळविली. पुढे जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले आणि त्याबरोबर ब्रिटन व जर्मनी यांच्यामध्ये व्यापारी स्पर्धाही सुरू झाली. यूरोपातील राजकरणातदेखील आपल्याला धुरीणत्व (हेगिमनी) मिळावे, असे जर्मनीस वाटू लागल्याने जर्मनीची फ्रान्स व रशियाशी चढाओढ सुरू झाली. जर्मनीत लष्करी अधिकारीवर्गाचा ज्रमनीच्या धोरणावर प्रभाव होता. जर्मनीला फ्रान्स व रशिया हेच दोन प्रमुख शत्रू वाटत असल्याने जर्मन सेनाधिकाऱ्यांनी या दोन्ही देशांशी युध्द झाल्यास त्याविरूध्द करावयाच्या लष्करी कारवाईच्या योजना तयार ठेवली होती.

Similar questions