pani hech jeevan essay in marathi
Answers
Explanation:
Homeनिबंधपाणी हेच जीवन मराठी निबंध | Pani hech jivan Marathi essay.
पाणी हेच जीवन मराठी निबंध | Pani hech jivan Marathi essay.
HostJuly 31, 2020
नमस्कार मित्रांनो आज आम्ही पाणी हेच जीवन आहे ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहोत, ह्या निबंधा मदे आम्ही पाणी हेच आपले जीवन का आहे आणि पाणी इतक्या महत्वाचे का आहे ह्यचे वर्णन केले आहे.
Water is life Marathi essay
पाणी हेच जीवन.
पाण्याला जीवन असे नाव आहे. ते एकदम सार्थ आहे. कारण सर्व सजीवांचे जीवनच पाण्यावरच अवलंबून आहे. मानवाची पाण्याची गरज मानव जातीच्या निर्मितीपासूनची आहे. मानवी शरीरालाच फक्त नव्हे तर मानवाच्या उत्क्रांतीसाठी , भरभरटीसाठी व प्रगतीसाठी पाणी आवश्यकच होते.
यामुळेच आदिमानव भटकंती सोडून जेव्हा एकेठीकाणी स्थिर झाला तेव्हा त्याने नदीकाठीच वस्ती केली. त्यातूनच सिंधू, नाईल, युफ्रेटीस इत्यादी संस्कृती उदयास आल्या. पुढे पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे व आहे ते पाणी योग्य रितीने न वापरल्यामुळेच या संस्कृती नष्टही झाल्या.
पाणी आपले जीवन, पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का ? देशातील जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते दुषित होत चालले आहेत. आपण आपल्या हाताने पाण्याचे हे स्तोत्र नष्ट करत आहोत का ? पुढील पिढ्यांसाठी आपण ह्या प्रदूषित नद्या, दुषित पाण्यामुळे होणारे रोग हा वारसा ठेवून जाणार आहोत का याचा प्रत्येक सुज्ञ माणसाने विचार करायला हवा.
अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात अडथळा करणे ह्याने आपण आपल्या निसर्गाची अवहेलनाच करत आहोत. देशातील जवळ जवळ दोन तृतीयांश नद्या ह्या कोरड्या पडल्या आहेत तर बाकीच्या प्रदूषित झाल्या आहेत . शेती साठी लागणारी जमीन आहे पण प्रदूषित पाण्यामुळे पीकही घेवू शकत नाही अशी आपल्या इथल्या शेतकर्याची अवस्था आहे. पाण्याचे नीट नियोजन न केल्याने दुष्काळ हा देशाच्या पाचवीला पुजलेलाच आहे.
आणि जो पाणीसाठा शिल्लक आहे त्यात कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, नदीकिनारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीत मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा ,वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी, गंगेत काही ठिकाणी प्रेत सुद्धा सोडले जाते. हे करून आपण निसर्गाला नष्ट करण्यात हातभारच लावत आहोत जलचरांच्या दुर्मिळ जाती नष्ट करत आहोत निसर्गाचा विध्वंस करत आहोत. नद्यांना वाहते ठेवल्यास देशात आपण हरित क्रांती घडवू शकतो. नद्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाट उचलू शकतो.
पाण्याला मराठीत “रस” असेही एक नाव आहे. तेही अगदी सार्थ आहे. कारण पाणी हेच मानवी शरीराचा ’जीवनरस’ आहे. मानवी शरीर ब-याच अंशी पाण्याचे बनलेले आहे. लहान बालकाच्या शरीराचा ७५ टक्के भाग पाण्याचा असतो. हे प्रमाण हळूहळू बदलत जाऊन प्रौढामध्ये त्याचे प्रमाण साधारणत: ६० ते ६५ टक्के होते.
मानवी शरीरामध्ये ६० -७५ टक्के पाणी असूनही जर शरीराभोवती जलरोधक त्वचा नसती तर या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गेले असते. मग द्राक्षे सुकवून बनविलेल्या मनुका जसे दिसतात तसा माणूस दिसला असता.
सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदासर्वकाळ योग्य व पुरेसे असावे लागते. शरीरातील पाण्याच्या १० टक्कयाहून जास्त पाणी कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही.
मानवी शरीर अन्नाशिवाय काही आठवडे राहू शकते पण पाण्यावाचून सात दिवसापेक्षा जास्त तग धरू शकत नाही. इतके पाणी शरीराला लागते तरी कशासाठी? शरीरातील पाण्याचा दोन तृतीयांश भाग पेशींमध्ये असतो. उरलेला एकतृतीयांश भाग रक्त व इतर द्रवांच्या रुपाने वहात असतो.
तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला प्रत्येक स्नायुला त्याचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही दिवसातून कित्येक वेळेला पाणी पिता, त्याच प्रमाणे जेवता, रस पिता, थंडपेये पिता, तेव्हा तुमच्या शरीरात पाणी जाते. दिवसातून जितक्यावेळा तुम्ही लघवी करता तितक्या वेळा तुम्ही शरीरातून पाणी बाहेर टाकता. याव्यतिरिक्तही अनेक प्रकारे हे पाणी तुमच्या शरीरातून बाहेर पडत असते.
खूप थंड प्रदेशातील लोक जेव्हा श्वास सोडतात किंवा बोलतात तेव्हा त्यांच्या श्वासावाटे पाण्याची वाफ बाहेर जाताना तुम्ही पाहिलेच असेल. याचाच अर्थ तुमच्या उच्छवासातून पाणी शरीराबाहेर टाकले जाते.
तसेच खूप उष्णप्रदेशात किंवा कडक उन्हाळ्यात त्वचेच्या सूक्ष्मछिद्रांवाटे घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकले जाते. याच पाण्याचे बाष्पिभवन झाल्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. अशाप्रकारे लघवी व्यतिरिक्त सर्वसाधारणपणे तुम्ही एक लिटर किंवा जास्त पाणी शरीराबाहेर टाकता. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण जर योग्य व पुरेसे ठेवायचे असेल तर सर्वप्रकारे शरीराबाहेर टाकलेल्या पाण्याइतकेच किंवा जास्त पाण्याचा पुरवठा तुमच्या शरीरास व्हायला हवा हे तुम्ही लक्षात ठेवा!.
तुम्ही पाणी प्याला नाहीत तर तुमचे तोंड व जीभ कोरडी होईल. तुम्हास तहान लागेल व शरीरास थकवा जाणवेल. तुमच्या शरीरातील मीठाचे प्रमाण वाढेल यामुळे तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो.
प्रवासातही शक्य असेल तर असेच पाणी बरोबर घेऊन जा किंवा शक्य असेल व परवडत असेल तर सीलबंद बाटलीतून मिळणारे खनिजयुक्त पाणी प्या.
पाणी नळाचे असो की सीलबंद बाटलीतील ते तुमच्या शरीरास आवश्यक व योग्यच आहे. त्यामध्ये शरीराला आवश्यक कॅल्शियम, पोटॅशियम व मॅग्नेशि्यम ही खनिजे अल्पप्रमाणात असतात . तेव्हा “जल हेच जीवन” म्हणून भरपूर पाणी प्या!!.