Science, asked by krushnapande28, 6 months ago


परागीकरण म्हणजे काय ? परागीकरनाचे प्रकार सांगा.

Answers

Answered by kangule
3

Answer:

Explanation:

एका फुलातील परागकणांचे दुसऱ्या फुलावरील स्त्री केसराबरोबर मिलन होणे म्हणजे परागीभवन होय. फलधारणेसाठी परागीभवन ही एक अत्यंत आवश्यक क्रिया आहे. परागीभवन म्हणजे परागकणांचे फळधारणेसाठी होणारे स्थलांतर होय. हे स्थलांतर किटक घडवून आणतात. परागीभवन होण्यास एका फुलाचे पराग म्हणजे नर, परागवाहकाच्या मदतीने दुसऱ्या झाडावरच्या फुलाच्या बीजांड म्हणजे मादीपर्यंत पोहोचून त्यांचा संयोग व्हावा लागतो. यात वाऱ्याचाही उपयोग होत असतो. तसेच पाण्याचाही उपयोग होतो. परागकण पाण्यात पडून प्रवाहाबरोबर वाहात जातात व दुसऱ्या फुलांचे परागसिंचन करतात. मात्र या दोन्ही प्रकारात नेमकेपणा नसल्याने वनस्पती मोठ्या प्रमाणावर परागनिर्मिती करतात. पक्षी ही या प्रक्रियेत मदत करतात. एकाच जातीच्या फुलांचे पराग त्याच झाडावरील फुलांतील स्त्रीकेसरावर पडल्यास त्या परागीभवनाला स्वपरागीभवन म्हणतात.

Similar questions