पर्जन्याचे उगम स्तान कोणते
Answers
पर्जन्य मापनाचा इतिहास कौटिल्यापासून सुरु होतो. त्यांच्या अर्थशास्त्रात तसा उल्लेख आहे.प्रगत साधनांचा इतिहास पाचशे वर्षांपूर्वीपासून सुरू होतो. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. तीन फूट व्यासाचा आणि दहा फूट उंचीचा दगड तयार केला जात असे. वरच्या बाजूला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत-कमी बाष्पीभवन व्हावे व पर्जन्य वापरण्यात अचूकता यावी यासाठी वरचा भाग निमुळता ठेवला जाई. उखळासारख्या या आकाराच्या तळाशी एक छिद्र असे. हे छिद्र चिखल व लाकडी पट्टी लावून बंद करता येत असे. असे तयार झालेले यंत्र जंगलात शेत शिवारात सहसा दृष्टिपथात येणार नाही अशा ठिकाणी खोल खड्डा खणून रोवले जाईल. पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जाई. या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाई व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाई. पुन्हा नव्या दिवशी नवे पावसाचे पाणी आल्यानंतर त्याचे मापन केले जाई.