India Languages, asked by jinalkanther2067, 1 year ago

परीक्षा नसत्या तर essay on this in marathi

Answers

Answered by princebaghi
56
. “परीक्षा नसत्या तर??”. शालेय जिवनात विद्यार्थी कित्तेक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि.टी. एक ना दोन असंख्य परीक्षांचा भडीमार चालु असतो वर्षभर. शिकतो म्हणुन परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणुन शिकतो असा प्रश्न मनामध्ये तरळुन जातो.

परीक्षांचे वेळापत्रक लागले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळ यायला लागले की सारं वातावरणच बदलुन जाते. विषेशतः वार्षीक परीक्षा. घरातला दुरदर्शन बघणे तसेही अशक्यच असते, ह्या काळात तर तो दुरदर्शनचा आवाजही ऐकु येत नाही. खेळाची मैदाने ओस पडलेली असतात. बाहेर पानगळतीचा हृतु चालु झालेला असतो. कोपऱ्या कोपऱ्यावर उसाची गुऱ्हाळ असतात. शाळेत वाचनलयातुन एखादे पुस्तक आणावे म्हणुन चक्कर मारावी तर शाळाही ओसच असतात. एखादा दुसरा मित्र भेटतो पण त्याच्याही चेहऱ्यावर परीक्षांचे ओझे दिसत असतेच.

Answered by ItsShree44
13

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀परीक्षा रद्द झाल्या तर...

परीक्षा जवळ आली की, मला खूप त्रास होतो. सारखा अभ्यास करावा लागतो. खेलता येत नाही. फिरायला जाता येत नाही. परीक्षेच्या दिवशी काही आठवत नाही. डोके दुखते. परीक्षेत उत्तरे नीट लिहिता येत नाहीत. मला वाटते की, परीक्षाच रद्द केल्या पाहिजेत!

खरोखर! परीक्षा रद्द केली, तर किती बरे होईल! मग पाठांतर करावे लागणार नाही. गृहपाठाच्या वह्या पूर्ण कराव्या लागणार नाहीत. दूरदर्शनवरील कार्यक्रम हवे तितके पाहता येतील. खूप खूप खेळता येईल. चित्रपट पाहायला मिळतील. अभ्यासासाठी आईबाबा दम देणार नाहीत. किती छान!

मात्र, परीक्षा खरोखरच रद्द झाली, तर पास-नापास कसे ठरवणार? पहिला क्रमांक कोणाचा, हे ठरवता येणार नाही. बक्षिसे कोणाला दयावीत, हे कळणार नाही. मग कोणीही डॉक्टर होईल, कोणीही इंजिनियर होईल. मग चुकीच्या औषधामळे रोगी दगावतील. घरे कोसळतील. चांगले सैनिक नसतील. म्हणून शत्रू आपल्या देशाला पराभूत करतील.

बाप रे! किती भयंकर! परीक्षा हव्यात! त्या रद्द होता कामा नयेत.

Similar questions