परीक्षा रद्द झाल्यास तर essay in marathi
Answers
■■परीक्षा रद्द झाल्या तर!!■■
काही मुलांना परीक्षेची खूप भीती वाटते. त्यांना परीक्षा नकोशा वाटतात, कारण परिक्षेच्या वेळी त्यांना काहीही करून अभ्यास करावेच लागते.
परीक्षा मुलांच्या मनात भीती व ताण निर्माण करते. अशा वेळी, परिक्षेमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे मनात विचार येतो, परीक्षा रद्द झाल्या तर!!
परीक्षा रद्द झाल्या तर, किती बरे होईल ना! आपल्याला अभ्यास करायला लागणार नाही. अभ्यास न केल्यामुळे आपल्याला कोण ओरडणार नाही. फक्त मज्जाच मजा.
पण, परीक्षा रद्द झाल्या तर, आपण वेळेवर अभ्यास करणार नाही. अभ्यास केला नाही तर, आपल्याला ज्ञान कसे मिळेल?विविध गोष्टींची जाणीव कशी होईल?आपण शिकलो नाही तर आपल्याला चांगली नोकरी मिळणार नाही.
परीक्षेमुळे चांगले गुण निर्माण होतात.एखाद्या कामासाठी योग्य कोण, हे आपल्याला परिक्षेमुळे कळते.आपली विचार करण्याची क्षमता वाढते.आपण वेळेचे नियोजन शिकतो.
म्हणून परीक्षा असायलाच पाहिजे.
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀परीक्षा रद्द झाल्या तर...
परीक्षा जवळ आली की, मला खूप त्रास होतो. सारखा अभ्यास करावा लागतो. खेलता येत नाही. फिरायला जाता येत नाही. परीक्षेच्या दिवशी काही आठवत नाही. डोके दुखते. परीक्षेत उत्तरे नीट लिहिता येत नाहीत. मला वाटते की, परीक्षाच रद्द केल्या पाहिजेत!
खरोखर! परीक्षा रद्द केली, तर किती बरे होईल! मग पाठांतर करावे लागणार नाही. गृहपाठाच्या वह्या पूर्ण कराव्या लागणार नाहीत. दूरदर्शनवरील कार्यक्रम हवे तितके पाहता येतील. खूप खूप खेळता येईल. चित्रपट पाहायला मिळतील. अभ्यासासाठी आईबाबा दम देणार नाहीत. किती छान!
मात्र, परीक्षा खरोखरच रद्द झाली, तर पास-नापास कसे ठरवणार? पहिला क्रमांक कोणाचा, हे ठरवता येणार नाही. बक्षिसे कोणाला दयावीत, हे कळणार नाही. मग कोणीही डॉक्टर होईल, कोणीही इंजिनियर होईल. मग चुकीच्या औषधामळे रोगी दगावतील. घरे कोसळतील. चांगले सैनिक नसतील. म्हणून शत्रू आपल्या देशाला पराभूत करतील.
बाप रे! किती भयंकर! परीक्षा हव्यात! त्या रद्द होता कामा नयेत.