परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह आणि पोषकद्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो? का?
Answers
★ उत्तर - परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह हा एकेरी असतो.आणि पोषकद्रव्यांचा प्रवाह चक्रीय असतो.
परिसंस्थेतील ऊर्जेचा महात्त्वाचा घटक म्हणजे सूर्य परिसंस्थेतील हरीत वनस्पती एकूण सौर उर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात.विघटकापर्यंत पोहोचण्यापूर्वी हि ऊर्जा एका पोषण पातलीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते.विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कोणतीच ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो.
सजीवांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते.शिलावर्ण, जलावरण, वातावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते.जसे वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे CO2 चे कर्बोदकांत रूपांतर करतात. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात.म्हणजे वनस्पतिकडून जैविक कार्बन अनुक्रमे शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राण्यांकडे संक्रमित होतो.शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जिवाणू व बुरशीद्वारे अपघटन होऊन CO2 वायू मुक्त होऊन वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरलं जातो.
धन्यवाद...