परिसंस्थेतील पोषणद्वव्याचा प्रवाह प्रक्रिया असते कारण लिहा
Answers
Answered by
3
Answer:
★उत्तर - पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो.कारण सजीवांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते.शिलावरण,जलावरण, वातावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. जसे वनस्पती (हिरव्या) प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे CO2 चे कर्बोदकात रूपांतर करतात तसे शाकाहारी प्राणी वनस्पती खातात.शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात म्हणजे वनस्पतींकडून जैविक कार्बन अनुक्रमे शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्यांकडे संक्रमित होतो.शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशीद्वारे अपघटन होऊन वायू मुक्त होऊन वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरात येतो.
धन्यवाद...
Similar questions