पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
42
पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर:-
१) पर्यावरणाचा ऱ्हास हि जागतिक समस्या आहे . पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा आणि शास्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी या उद्देशाने पॅरिस, रिओ, अश्या ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या जातात.
२) भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रिय आहेत.
३) अनेक आदोलनांनी व पर्वावरण चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे.
४) नमामि गंगे सारखे गंगा नदी जल शुद्धीकरण आंदोलन, हरितक्रांती, जैवविविधतेचे संरक्षण , चिपको सारखे वृक्ष संवर्धन व संरक्षणासाठी आंदोलन ,अशे अनेक अंदोलन करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पर्यावरण चळवळी वेळोवेळी मदत कार्य करतात.
५) पर्यावरण ऱ्हास रोखण्यासाठी शासनच नव्हे तर लोकसहभाग हि मोठ्या प्रमाणात आहे.
Similar questions