पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात?
Answers
अनेक क्षेत्रांमध्ये पर्यावरणसंबंधातील स्वतंत्र शाखा निर्माण झाल्या आहेत. या कार्यशाखांचा आणि त्यातील करिअर संधींचा परिचय करून देणारा लेख-
अलीकडे अनेक क्षेत्रांमध्ये पर्यावरणाशी संबंधित कामाचा स्वतंत्र विभाग निर्माण होऊ लागला आहे. आजही करिअरच्या दृष्टीने पर्यावरण या क्षेत्राचा प्राधान्याने विचार करणाऱ्यांची संख्या कमी जरी असली तरीही प्रत्येक क्षेत्रातील पर्यावरणाशी संबंधित अशा या नव्या करिअर संधींमुळे या क्षेत्रांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
कायदा
गेल्या २० वर्षांत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कायदा क्षेत्रात मोठे बदल घडून आले. आज आपल्या देशात पर्यावरण कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी
‘ग्रीन ट्रिब्युनल’ स्थापन करण्यात आले आहे. आज नागरिकांना पर्यावरणविषयक हक्कांचे भान आले आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक तंटे आणि दाव्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे अर्थातच पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या वकिलांना मोठय़ा संधी उपलब्ध आहेत. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील पर्यावरणविषयक तंटे तसेच पर्यावरणाशी संबंधित सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात लढण्यासाठी आज पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या वकिलांची गरज आहे. देशात विविध ठिकाणी विकास प्रकल्पांमध्ये होणारी पर्यावरणाची हानी तसेच कायद्यांचे उल्लंघन याला वेसण घालण्यासाठी स्थानिक नागरिकांना वेळोवेळी पर्यावरण कायद्याची शास्त्रशुद्ध माहिती असलेल्या वकिलांची गरज भासते. नवी दिल्लीतील लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अॅण्ड एन्व्हायर्नमेंट (छकाए) ही संस्था म्हणजे विकास प्रकल्पांची झळ लागलेल्या पीडित नागरिकांना कायदाविषयक सल्ला पुरवणारे व्यासपीठ आहे. अशा प्रकरणांमध्ये काम करताना तक्रारींची शहानिशा करणे, दाव्यांची सत्यासत्यता पडताळणे त्याचप्रमाणे विकास प्रकल्पांचे पर्यावरणावर होणारे अनिष्ट परिणाम तपासणे यासाठी सखोल संशोधनाची आवश्यकता असते. त्यासाठी भरपूर वेळ, सविस्तर वाचन, अचूक तांत्रिक माहिती संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची नितांत गरज असते. मात्र, हे प्रयत्न सफल झाल्यास त्यातून हजारो, लाखो व्यक्तींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.. त्यातून मिळणारे समाधान अनमोल असते.
या पेशात प्रवेश करण्यासाठी कायदा क्षेत्रातील पदवी संपादन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जोडीला पर्यावरणविषयक तांत्रिक शिक्षण असल्यास उत्तम.
पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या वकिलांना कायदा कंपन्या, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स तसेच सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे अनेक विधी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणूनही ते पदभार सांभाळू शकतात.