६) परतीचा मान्सून म्हणजे काय?
Answers
Answer:
भारतीय शेती आणि भारताचे अर्थकारण अजूनही पावसावरच अवलंबून आहे. सामान्य माणसाला पावसाची प्रतीक्षा असतेच. किंबहुना, त्याहीपेक्षा अधिक प्रतीक्षा शेतकर्याला असते. त्यामुळे हवामान खात्याकडून वर्तवल्या जाणार्या पावसाच्या अंदाजाकडे सर्वांचेेच डोळे लागलेले असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत हवामान खात्याकडून वर्तवले जाणारे मोसमी पावसाचे अंदाज फसत चालले आहेत. त्यामुळे हवामान खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पाऊस ही एक वातावरणामधली एक प्रक्रिया आहे. जून-जुलैमध्ये मान्सून हिमालयापर्यंत धडकतो. कृषीप्रधान देश म्हणवणार्या भारत देशाचा जुलै ते ऑक्टोबर असा खरीप हंगाम यावर अवलंबून असतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावेळी प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातील बाष्पामुळे आणि ‘ईशान्य मोसमी’ वार्यांमुळे ‘रिटर्न’ म्हणजे परतीचा मान्सून’ पाऊस देतो. या पावसावर ऑक्टोबर ते मार्च असा रब्बी हंगाम पिकतो. त्यामुळे परतीच्या पावसाचेही भारतीय शेतीसाठी महत्त्व अनन्यसाधारण आहे.
दिशाभूल आगमनाची
यंदा हवामान खात्याचा मान्सून सुरू होत असतानाच अंदाज फसला. हवामान विभागाने मान्सून लवकर जाहीर करून घाई केली. मान्सूनपूर्व पावसालाच या विभागाने मान्सून पाऊस ठरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यानंतर मान्सून ‘ब्रेक’ जाहीर करण्याची वेळ आली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या ठिकाणी वीज आणि धुळीच्या वादळासह मान्सूनपूर्व पाऊसच पडत होता. त्यावेळी मान्सून जाहीर करून हवामान खाते मोकळे झाले. आता पुन्हा हवामान खात्याचा परतीच्या पावसाचा अंदाज फसला आहे. ‘परतीचा पाऊस यंदा होणारच नाही,’ असा इशारा हवामान खात्याने 18 सप्टेंबरला दिला. हा अंदाज शेतकर्यांसह सर्वसामान्यांच्या हृदयात धडकी भरवणारा होता. या इशार्याने दीड ते दोन महिन्यांपासून परतीच्या पावसाची वाट पाहणार्या शेतकर्यांच्या मनात भीती पसरविली. खरिपाची शेती उद्ध्वस्त होते की काय, अशी परिस्थिती असताना परतीचा पाऊस न झाल्यास रब्बी पिकवायचा कसा, पेरायचे काय, असा मोठा प्रश्न शेतकर्यांना पडला; पण शेवटी वरुणराजालाच बळीराजाची काळजी होती की काय कोण जाणे; पण हवामान विभागाने इशारा दिलेल्या दिवशीच महाराष्ट्रात जागोजागी परतीच्या पावसाच्या धारा कोसळल्या. त्यानंतर दुसर्या दिवशीदेखील पुन्हा पाऊस झाला. अशा प्रकारे परतीचा पाऊस जागोजागी होत आहे.
हवामान खात्याने यासंदर्भात काहीही भाष्य न करता, आपला इशारा-अंदाज चुकल्याचे स्पष्टीकरण न देता त्यावर कडी करत दुसर्या दिवशी विजांचा, वादळाचा इशारा नाशिक, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांसाठी दिला. विशेष म्हणजे, परतीच्या पावसाच्या वेळीच विजा चमकतात, हे हवामान खात्याला शेतकर्यांनी शिकवायची गरज नाही; पण तरी हा दिशाभूल करणारा खेळ हवामान खात्याकडून सुरू आहे. अशा प्रकारे चुकीचा अंदाज जाहीर करून हवामान खात्याने शेतकर्यांना संभ्रमित केले, तसेच संकटात टाकले होते.
बदललेला पॅटर्न
2003 पासून 2018 म्हणजे या वर्षाच्या काळातील पावसाचे भारतभरातील स्वरूप पाहता ‘मान्सूनचा पॅटर्न’ बदललेला आहे, हे स्पष्ट होते. मान्सून आता जूनमध्ये दाखल झाला तरी, त्याची खरी सुरुवात जुलैमध्ये होते आणि ऑगस्टमध्येच तो खर्या अर्थाने सक्रिय होताना दिसतो. 15 सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो; पण गेली काही वर्षे तो नोव्हेंबपर्यंत सक्रिय होता. 2003, 2004, 2008, 2009 या काळातील मान्सून वेगळा होता. या वर्षांत जून-जुलैमध्ये पाऊस कमी होता आणि ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तो अधिक होता. 2010 मध्ये तर थेट डिसेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम होता. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये तर मुसळधार पाऊस झाला. 2009 मध्येही नोव्हेंबरपर्यंत मान्सून सक्रिय होता. 2010 मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि थेट डिसेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम होता. 2012 मध्येदेखील त्याने राजस्थानमधून फार उशिराने मान्सूनने प्रस्थान केले आणि गुजरातेत तो ऑक्टोबरमध्येही सक्रिय होता. मान्सून पॅटर्न बदलला आहे, तो उशिरा येऊ लागला आहे आणि परततानादेखील उशीर करीत हिवाळ्याचे दिवस त्याने कमी केले आहेत. या बदलांचा मागोवा घेत, त्याची कारणमीमांसा करत आपल्या अंदाजांमध्ये अचूकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येक वेळी हवामान खाते साचेबद्ध आणि बरेचदा दिशाभूल करणारे अंदाज वर्तवत गेले.
भारतीय हवामान खात्याने एप्रिल आणि मे महिन्यामध्ये यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तवताना सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर शेतकर्यांमधून तसेच संपूर्ण देशामधून आशादायक वातावरण तयार झाले; मात्र पुरेसा पाऊस नसल्याने आणि पडणार्या पावसाचे विषम प्रमाण असल्याने, आता महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण शेतकर्यांचा भ्रमनिरास झालेला दिसतो आहे. सर्वांनाच दिलासा देणारे हे पर्जन्यमान अंदाज होते; पण अंदाज आणि वास्तव यांचा ताळमेळ घालणे आवश्यक असते. तसेच केवळ मान्सूनने सरासरी गाठली म्हणजे तो देशासाठी, शेतीसाठी आणि पर्यायाने सर्वसामान्यांसाठी उपकारक ठरतो, असे नाही. त्याचे आगमन, वितरण या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये बदल झाल्यास शेतकर्यांचे अर्थगणित कोलमडते. पेरणीच्या अंदाजातली चूक एकूण भारतीय शेतकर्याचा विचार करता, फार धोक्याची आणि दूरगामी वाईट परिणाम करणारी ठरू शकते.
घाईघाईने वर्तवल्या जाणार्या पावसाच्या अंदाजाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल हवामान खात्याला काहीच देणे-घेणे नसते. हवामान खात्याच्या अंदाजाचा परिणाम शेअर मार्केटवर, बी-बियाणे विक्री, खत कंपन्यांचा नफा यावरदेखील होतो. त्यामुळे अधिकाधिक सकारात्मक अंदाज देण्याकडे या खात्याचा कल असतो.
या सर्व पार्श्वभूमीवर केवळ हवामान खात्याच्या भाकितावर अवलंबून न राहता मोसमी पावसाची प्रक्रिया शेतकर्यांनी समजून घेत शेतीचे नियोजन केले तर होणारे नुकसान बर्याच अंशी टाळता येईल
परतीचा मान्सून
Explanation:
मानसून के मौसम को पीछे छोड़ना दक्षिण पश्चिम मानसून की वापसी की शुरुआत के साथ शुरू होता है [मध्य सितंबर - नवंबर]] और जनवरी की शुरुआत तक रहता है। यह 3 महीने की लंबी प्रक्रिया है, जहां यह अक्टूबर में प्रायद्वीप से शुरू होती है और दिसंबर तक चरम दक्षिण-पूर्व सिरे से। दक्षिण-पश्चिम मानसून दिसंबर के मध्य में कोरोमंडल तट से हट जाता है। पंजाब में, दक्षिण-पश्चिम मानसून सितंबर के दूसरे सप्ताह में वहां से हट जाता है। पीछे हटने वाले मानसून की वापसी धीरे-धीरे होती है और अग्रिम की तुलना में लंबी अवधि होती है।
Learn More
उपग्रह मौसम निदेशालय कहां स्थित है
https://brainly.in/question/13865958