pariksha nasty tar marathi essay
Answers
Answer:
नुसता विचारही किती सुखावह आहे.. “परीक्षा नसत्या तर...??” शालेय जीवनात विद्यार्थी कित्येक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि.टी. एक ना दोन असंख्य परीक्षांचा भडीमार चालू असतो वर्षभर. शिकतो म्हणून परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणून शिकतो असा प्रश्न मनामध्ये तरळून जातो.
अश्या ह्या परीक्षाच बंद झाल्या तर कित्ती मज्जा येईल. सगळीकडे आनंदी आनंद पसरेल. परीक्षांच्या चिंता नाहीत, वेळापत्रकांचे ओझे नाही, अभ्यासाची कटकट नाही. परीक्षा नाहीत तर गुण नाहीत, टक्केवारी नाही, पास/नापास व्हायची चिंता नाही. कुणी ‘हुशार’ कुणी ‘ढ’ असा भेदभावच होणार नाही. शालेय जीवनाची सर्व संस्कृतीच बदलून जाईल.
पण.. परीक्षा नाही झाल्या, सगळेच पास झाले तर खऱ्या गुणवत्तेचा कस कसा लागणार? शाळा-कॉलेजातून बाहेर पडल्यावर जेंव्हा आपण आयुष्यातील खऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ तेंव्हा आपले हात-पाय थरथरायला लागतील कारण त्यावेळेस परीक्षांना सामोरे जायला आपण तयार नसू. परीक्षा नसेल तर आपण मिळवलेले ज्ञान आणि त्याचा समजलेला अर्थ हा चूक का बरोबर हे कसे समजणार?
परीक्षा हव्यातच. परीक्षा व्यक्तीला त्याची विद्या आणि त्याची बुध्दी अधिक तल्लख करायला भाग पाडतात. परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना अधिकाअधिक ज्ञान मिळवण्यासाठी आणि मिळवलेले ज्ञान पुन्हा-पुन्हा पडताळून पाहण्यासाठी भाग पाडतात. परीक्षा मनुष्याला आयुष्यात येणा़ऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात.
त्यामुळे परीक्षा नसत्या तर हा विचार सुखावह असला तरी त्याचे परिणाम भावी आयुष्यात नक्कीच सुखावह नसतील.