Hindi, asked by ganeshbhonde2001, 3 months ago

पसायदानात ज्ञानेश्वरांनी परमेश्वराजवळ कोणते मागणे मागितले आहे.​

Answers

Answered by sweetgirl2323
3

Answer:

संत ज्ञानेश्वर--पसायदान ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे.आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे(श्रुतिप्रस्थान)ब्रह्मसूत्र(न्यायप्रस्थान)भगवद्गीता(स्मार्तप्रस्थान) अशी प्रस्थानत्रयी आहे.प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे,प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे.उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे.भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा,दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.मह्राठियेचिये नगरी।.ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला.हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे,त्या साठी आवश्यक असे तप केले आहे.या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’नावाचे अमृत निघाले .आतां या विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थाना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात.”जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते.ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो.ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरुपी यज्ञ सिध्दीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा संत नामदेवांनी “आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा । माझिया सकळां हरिच्या दासां ।।” असा क्रुपाप्रसाद मागितला.संत तुकाराम म्हणतात,”हें चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा “.समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलें पसायदान असे आहे “कल्याण करी देवराया।जनहित विवरी ।। तळमळ तळमळ होत चि आहे। हे जन हाति धरी ।। संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे

Explanation:

Similar questions