Art, asked by vidhyagholve1111, 4 days ago

पतीच्या मृत्यूनंतर स्वाती महाडिक यांच्या पुढे समाजाने कोणती प्रलोभने ठेवली होती? ​

Answers

Answered by cashmyr0210
0

Answer:

Bruv what does that mean

Explanation:

Answered by rajraaz85
1

Answer:

महाराष्ट्राचे शहीद जवान संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांना विरांगणा असे संबोधण्यात आले. पतीच्या मृत्यूनंतर त्या खचल्या नाही. तर धैर्याने उभ्या राहिल्या व रणांगणात युद्धासाठी सज्ज झाल्या. त्यामुळे त्यांना विरांगणा असे म्हटले जाते.

समाजाने स्वाती महाडिक यांच्या पुढे शिक्षण क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, अनेक संधी देऊ केल्या व त्याबरोबरच सुखासीन आयुष्य देऊ केले ही प्रलोभने समाजाने त्यांच्यापुढे ठेवली होती. पण सर्व प्रलोभने स्वाती महाडिक यांनी नाकारली.

त्यांनी सैन्यात भरती होण्याचे ठरवले व आपल्या पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा निश्चय त्यांनी‌ केला. पित्याचे छत्र हरपलेल्या दोन्ही मुलांना सैन्यात भरती करेन असा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

आर्मी चे आयुष्य फक्त एक नोकरी नाही तर जीवन जगण्याचा नवा मार्ग आहे असे त्या म्हणतात. पतीच्या निधनाचे डोंगराएवढे दुःख त्यांनी सहज पचवले व नव्या आयुष्याला सुरुवात केली. आणि त्या सैन्यात भरती झाल्या त्या रडत बसल्या नाही तर धैर्याने उभे राहून त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सामना केला व त्यांच्या पतीचे स्वप्न पूर्ण केले.

Similar questions