India Languages, asked by dhruv21605, 2 days ago

*पत्र लेखन*

विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे तो पुर्ववत करणारे पत्र.​

Answers

Answered by somyaranjann868
7

Answer:

प्रती,

माननीय अधिकारी

महाराष्ट्र विद्युत मंडळ

डोंबिवली 421201

विषय :- वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याबाबत

माननीय महोदय,

मी तुकाराम नगर मधील राहणारी दहावीची विद्यार्थिनी आहे. आमच्या विभागात गेल्या पंधरवड्यापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. करोंनामुळे यंदा ऑनलाइन शिक्षण तसेच नोकरदार वर्गाला घरी बसून इंटरनेटवर काम करणे गरजेचे झाले आहे. विजेच्या पुरवठा खंडित झाल्यामुळे घरातून काम करणार्‍या नोकरदार वर्गाला आणि ऑनलाइन शिक्षण घेणार्‍या आमच्यासारख्या विद्यार्थांना फटका बसत आहे. वीज गेल्यामुळे अनेकदा इंटरनेट नेटवर्कमध्ये समस्या येतात. त्यामुळे अध्ययन करण्यास अनेक अडचणी येत आहे. शिवाय उकड्याने सर्व नागरिक त्रस्त झाली आहेत.

कृपया आपण या समस्येवर लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी व या त्रासातून सर्वांची मुक्तता करावी ही नम्र विनंती

तसदीबद्दल क्षमस्व

आपली विश्वासू ए.ब.क.

Answered by SharadSangha
0

ते,

वीज मंडळाचे प्रमुख,

दिल्ली बिजली वितरण केंद्र.

तारीख:- 22.09.2022

विषय- वीज पुरवठ्यातील व्यत्यय

आदरणीय साहेब,

या पत्राद्वारे मी माझ्या भागातील वीज पुरवठ्यातील व्यत्ययाकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. वीज ही कोणत्याही घराची मुलभूत गरज असल्याने, वीज खंडित झाल्यामुळे अनेक कामे खोळंबतात. इतकेच नाही तर माझ्या कॉलनीतील लहान मुलांची परीक्षा डोक्यावर असून या समस्येमुळे त्यांना नीट अभ्यास करता येत नाही. वीज पुरवठा वारंवार होत नसला तरी आजकाल बिले खूप येतात.

माझ्या सर्व शुभेच्छांसह, मी संबंधित प्राधिकरणाला विनंती करतो की कृपया या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्या आणि या सर्व समस्या गांभीर्याने तपासण्यासाठी आमच्या भागात एक पर्यवेक्षक उपलब्ध करून द्या.

                                                                  आपला आभारी

तुमचा विश्वासू,

रोशन

आरडीबी नगर

#SPJ2

Similar questions