Math, asked by gauravarora3116, 1 year ago

पत्रलेखन नमुना कृती : १ ||
• पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा :
'झाडे लावा... झाडे जगवा'
क/ हिरवाई ट्रस्ट, तळेगांव दाभाडे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
( रोपांचे मोफत वाटप )
संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगांव दाभाडे
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची
मागणी करणारे पत्र लिहा.
चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टच

Answers

Answered by fistshelter
98

Answer:

अ.ब.क.

नूतन विद्यालय,

सणसवाडी,

पुणे- ४२१३८५.

दि.- २५ मे,२०१९.

प्रति,

हिरवाई ट्रस्ट,

बालोद्यान मार्ग,

तळेगाव दाभाडे,

पुणे- ४२६७८५.

विषय- रोपांच्या मागणीबाबत.

महोदय,

५ जून रोजी जगभरात साजरा केला जाणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित आपल्या ट्रस्टतर्फे 'झाडे लावा, झाडे जगवा' या कार्यक्रमांतर्गत मोफत रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याचे समजले.

याच दिवशी आमच्या विद्यालयातदेखील वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी आम्हांला फुलांची, फळांची तसेच औषधी असे मिळून एकूण ५० रोपांची आवश्यकता आहे. ही रोपे आपल्या ट्रस्टतर्फे आम्हांला देण्यात यावीत अशी विनंती आहे. सोबत दिलेल्या विद्यालयाच्या पत्त्यावर शक्य तितक्या लवकर या रोपांची पाठवणी करण्यात यावी.

धन्यवाद.

कळावे,

आपला विश्वासू,

अ.ब.क.

Step-by-step explanation:

Similar questions