India Languages, asked by mishraanjana478, 1 month ago

पत्रलेखन :- पुढीत्य निवेपन वाचा व त्याखावीत्य कृती सोडवा.
उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

संवेदनशील मन, दुसऱ्याच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करणारे, मराठीचे पुरस्कर्ते आणि पत्रसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिक धडपड करणारे व्यक्त‌िमत्व म्हणजे पारोळ्याचे सदानंद तथा स.ध. भावसार.

सदानंद भावसार राहणारे मुळचे पारोळा तालुक्यातील बहादरपूरचे. वडील सर्वसामान्य शेतकरी. तेही कर्जबाजारी झालेले. बहादरपूरला अकरावीपर्यंत शिक्षण झाले. मॅट्रीकला ७२ टक्के गुण मिळवून अमळनेर केंद्रात प्रथम आले. मात्र, पैशाअभावी पुढे शिकता आले नाही. शाळेत असताना चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा दिलेली असल्याने कृषी खात्यात ट्रेसरची नोकरी लागली. नोकरी करताना बहिःस्थ शिकण्याची परवानगी वरिष्ठांना मागितली असता ती नाकारण्यात आली. मात्र टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची गणिताभिज्ञ ही गणित विषयाची परीक्षा दिली आणि याच आधारावर तामसवाडीच्या नागरिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शिक्षकाची नोकरी त्यांना देऊ केली.

स.ध. भावसार यांनी कृषी खात्याची नोकरी सोडून शिक्षकी पेशातच ते रमले. पुढे पारोळ्याला उर्वरीत नोकरी केली. आपल्या ३८ वर्षांच्या नोकरीत एम.ए.बी.एड पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले. कला शाखेचे एम.ए. शिकलेला हा शिक्षक मात्र गणिताचे अध्यापन करीत राहिला. भूमितीचे कृती संशोधन त्यांचे राज्यात तिसरे ठरले आणि कला शाखेचा पदवीधर भूमितीचे कृती संशोधन करीत तिसरा येतो याबद्दल त्यांचा गौरवही झाला.

२००५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्वीपासून असलेला छंद त्यांनी जोपासला. यात वृत्तपत्र वाचन, लेखन, गुणीजनांचा सत्कार, पत्राव्दारे अभिनंदन शुभेच्छा पत्र पाठविण्याच्या १९७६ पासून असलेल्या छंदास अधिक वेळ ते देऊ लागले. शहर, तालुका, जिल्हा राज्य येथे काही चांगले घडले असेल तर वाचण्यात आलेल्या त्या व्यक्तीस अभिनंदनाचे पत्र ते पाठवित. २०१३ अखेर त्यांनी ३० हजार ३११ अभिनंदनपर पत्रे पाठविली असून, त्यास ९ हजार ३७३ जणांकडून उत्तरे देखील आली आहेत. विशेष म्हणजे राज्यातून नांदेड, नाशिक, औरंगाबाद, पुणे, सांगली, सोनगड (गुजरात) येथून अभिनंदन पत्र पाठविल्याने संबंधित व्यक्ती भावसारांना भेटण्यास आले होते. याबाबतच एक किस्सा स.ध.भावसार सांगतात - चहार्डी ता. चोपडा येथील माहेर असलेल्या मंदाकिनी वसंतराव पाटील या गुजरातमधील सोनगडच्या नगराध्यक्ष बनल्या. आपल्या गावाकडील लेक नगराध्यक्ष झाली म्हणून जिल्हावासी नागरिक या नात्याने अभिनंदन पत्र त्यांनी पाठविले. महाराष्ट्रातून एकही अभिनंदन पत्र न गेलेल्या मंदाकिनी चहार्डीला आल्या असता पारोळ्यास घर शोधत भेटण्यास आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. हा प्रसंग त्यांनी मनाच्या एका कप्प्यात जपून ठेवलाय. तसेच मध्यप्रदेश, राजस्थानच्या मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ते पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल यांनी भावसारांनी पाठविलेल्या अभिनंदन पत्रास उत्तरे देखील पाठविली आहेत. मात्र जळगावच्या राष्ट्रपती झाल्यानंतर तीन पत्रे पाठवून देखील, त्यांचे उत्तर आले नाही अशीही आठवण त्यांच्या खाती जमा आहे. अभिनंदन पत्र पाठवल्यावर भेटायला आलेल्या यशस्वी मुलाला तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील यश पाहून त्यास ५० ते २०० पर्यंत रोख पारितोषिकही ते देतात.

भावसारांकडे आर्थिक श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन हाच त्यांचा केवळ एकमात्र उत्पन्नाचा स्त्रोत आहे. तरी आपण काही सामाजिक - शैक्षणिक देणे लागतो याचे त्यांना संपूर्ण भान आहे. आपल्या गरजा मर्यादीत ठेवत त्यांनी आजवर ८४ व्यक्ती व संस्थांना ८१ हजार ६८१ रुपयांची आर्थिक मदत केली आहे. गेल्या २१ वर्षांपासून दहावी, बारावीतील सर्वप्रथम उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय बक्षीस समारंभ ते आयोजित करीत असतात. आतापर्यंत ११५ विद्यार्थ्यांना ९३ हजार ६१७ रुपये रोख व गौरवपत्र देऊन या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा यासाठी पारोळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा त्यांनी सुरू केली. यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सानेगुरूजी यांचे ‘श्यामची आई’ आणि महेश गोरडे यांचे ‘या टी.व्ही.चं करायचं काय’ ही पुस्तके भेट देतात. आतापर्यंत ३२१ मुलांना ही ४८ हजार ४७१ रुपयांची पुस्तके त्यांनी भेट दिली आहेत. त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकापासून समाजसाधना, समाजभूषण,

Answered by Anonymous
1

Answer:

I hope answer is helpful to us

Attachments:
Similar questions