Hindi, asked by omkar9548, 1 year ago

Paus padla nahi tar speech in Marathi​

Answers

Answered by sowmya909616
4

आपण शाळेमध्ये कधी गप्पा मारताना जर कोणी विचारले किंवा शिक्षकांनी जरी विचारले तरी सर्वजण अगदी उत्साहाने सांगतात “माझा आवडता ऋतू” म्हणजे “पावसाळा“. शाळेत असताना सर्वांनाच असे वाटते कि खूप पाऊस पडावा आणि शाळेला सुट्टी मिळावी. मग घरी राहून खूप भिजायचे ,कागदाची नाव (होडी) बनवून पाण्यात सोडायची ,चिखलात मस्त खेळायचे असा विचार करून बरेच जण आपण शाळेला दांडी सुद्धा मारतो.

पण सध्याच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात आपण वृक्षतोड करून त्याजागी मोठमोठ्या कंपन्या आणि इमारती उभारत आहोत, त्यामुळे प्रदूषण आणखीनच वाढत आहे. त्यामुळे पावसासाठी लागणारे अनुकूल हवामान नसल्यामुळे सध्या गेल्या काही वर्षांपासून म्हणावा असा पाऊस पडत नाहीये. मग हे पावसाळ्यातले अनुभव आपण कसे अनुभवणार? वर्तमान पत्रात रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बातमी येत असते, मला असा प्रश्न पडला कि ते कशामुळे आत्महत्या करत असतील? विचार केल्यानंतर सुचलं की कर्ज फेडू न शकल्यामुळे ते आत्महत्या करतात. भारतात शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. कधी पाऊस जास्त झाला तर पिकांचे नुकसान होते. तसेच कधी पाऊस न पडल्याने सुद्धा पिकांचे नुकसान होते. जर पीकच आले नाही तर ते कर्ज कसे फेडणार, त्यामुळेच ते आत्महत्येचा विचार करत असतील. अशाप्रकारे जर खरंच पाऊस पडला नाही तर … तर काय होईल? पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि मग झरे, विहिरी, बोअरवेल च्या रूपाने परत वापरात येते. खरंच पाऊस पडला नाही तर आपण पिणार काय? आपण कसे जगणार? एकवेळ माणूस किंवा कोणताही सजीव अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय आपण जास्त काळ जगूच शकत नाही.पाणी हे आपल्या जीवनाचे अमृत आहे.

पृथ्वीवरील जीवनाची सुरवात हि पाण्या मधेच झाली. आजही जेव्हा शास्त्रज्ञ परग्रहावर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते सर्वात पहिले पाणीच शोधत असतात. या पाण्यामध्ये एक नवीन जीवनमाला बनवण्याचे सामर्थ्य आहे. अश्या या मूलभूत, अपरिवर्तनीय जीवन घटकाला आपण आज काय किंमत देतो? यावर विचार करणे काळाची गरज आहे. आपल्या भारताची अर्थव्यवस्था हि या पावसावर अवलंबून आहे, ७०% पेक्षा जास्त लोग शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत. बऱ्याचश्या शेतकऱ्यांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे, जलसंधारणाची तशी फारशी व्यवस्था भारतात नाही. पण आपण सर्वजण याचा विचारदेखील करत नाही. आपण भरपूर प्रमाणात पाणी वाया घालवतो. शॉवर, वॉशिंग मशीन, टॉयलेट फ्लश मुले खूप पाणी वाया जाते. आपल्याकडे पावसावर अवलंबून असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणलोट सारख्या प्रकल्पांच्या पद्धती आपण विसरून गेलो आहोत. रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पामध्ये आपण घराच्या किंवा इमारतीच्या गच्चीवरील साचलेले पाणी जमा करून ते नंतर वापरू शकतो. तसेच ते पाणी बागेतील झाडांना हि वापरू शकतो. पाणलोट पद्धती मध्ये आपण पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत झिरवण्यास मदत करतो.

Similar questions