India Languages, asked by aapatilap, 5 months ago

Paus Sampavar Gela Tar Nibandh Marathi​

Answers

Answered by notty7
8

Answer:

शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता.घरी नेहमीप्रमाणे सकाळच्या बातम्या सुरु होत्या आणि तेव्हा माहित पडले जास्त पाऊस पडल्याने आणि सगळीकडे पाणी भरल्याने सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

मी अगदी आनंदाने नाचू लागले, पण टीव्हीवर नंतर पाऊस पडल्याने काय नुकसान झाले आहे ते बघितले. पावसाने केलेली नासाडी बघून मी थक्क झालो. आणि माझ्या मनात कल्पना आली की पाऊस पडला नाही तर किती बरे होईल ना.

पाऊस पडला नाही तर लोकांना पावसाच्या पाण्याने त्रास होणार नाही, पाणी साचून कोणाचेही काही नुकसान होणार नाही आणि लोक आनंदाने राहतील. पण नंतर माझ्या मनात दुसरा विचार आला.

पाऊस नसेल तर आपल्याला पाणी कसे मिळेल.जर पाऊस पडला नाही तर तळे आणि नद्या राहणारच नाही. पावसाचे पाणी नाही तर नद्या आणि तलावांमध्ये राहणारे जीव जगू शकणार नाही.

आपल्या आजूबाजूला सुंदर हिरवेगार निसर्ग आपण बघतो, पण जर पाऊस नसला तर झाडे जी आपल्याला हवा, खायला फळ आणि सावली देतात ते राहणारच नाही. पावसाच्या पाण्याविना सर्व झाडे सुकून जातील आणि सर्व झाडे मरून जातील. जे सुंदर निसर्ग आपण बघतो ते केवळ एक वाळवंट स्वरूप दगड धोंड्यांचे प्रदेश बनून जाईल.

आपल्याला पाऊस पडला नाही तर पावसाने मातीला येणारा सुगंध मिळणार नाही, पहिल्या पावसात भिजण्याची मजा घेता येणार नाही, इंद्रधनुष्य बघायला मिळणार नाही. पावसाळा आला नाही तर पावसात होणाऱ्या छत्रीचा कावळा बघता येणार नाही.

जर पाऊस पडला नाही तर आपल्याला खायला काहीही मिळणार नाही कारण पावसा विना शेती शक्य नाही. जर का पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर जीवन शक्य नाही कारण आपल्यांना प्यायला पाणीसुद्धा मिळणार नाही.

पाऊस पडल्याने नुकसान होते हे खरे आहे पण त्यामध्ये आपली सुद्धा चूक आहे कारण सगळीकडे सिमेंटीकरण केल्याने जमिनीला पाणी शोषता येत नाही. आणि शहरांमध्ये पावसाच्या पाण्याला नीट वाहता येत नाही आणि म्हणून पावसामुळे आपले नुकसान होते. पाऊस आहे तर जीवन आहे, म्हणून पाऊस हा पडलाच पाहिजे.

समाप्त.

Answered by ghadgeasmi3
0

Explanation:

कधीकधी पावसाचा खूप त्रास होतो. बाहेर पडता येत नाही. सतत छत्री घ्यावी लागते. तरीही मोठ्या पावसात कपडे दिसतात, दप्तर दिसते. सगळीकडे चिखल होतो. मैदान करता येत नाही. सायकल चालवता येत नाही. रस्त्यावर पाणी तुंबते. गाड्या अडकून पडतात. म्हणून मनात येते की, पाऊस संपावर गेला तर खूप बरे होईल. हा त्रास वाचेल.

पण तू खरोखरच पाऊस संपावर गेला तर ? तर खरोखरच अनर्थ होईल. नदी विहिरी आठून जातील. त्याला पाणी मिळणार नाही. जमीन कापून तिला भेगा पडतील. सगळीकडे फक्त कडकउन्हाळा असेल. सर्व वनस्पती नष्ट होतील. त्यामुळे माणसाचे प्राण्याचे हाल होतील.

शिवाय पाऊस नसेल तर पावसात भिजण्याचा आनंद मिळणार नाही. इंद्रधनुष्य कधीच दिसणार नाही. पाऊस नसेल तर सगळी मजाच निघून जाईल चे पावसाचा संपवू नकोस !

Similar questions