Music, asked by aditya442, 11 months ago

please give essay on MY FAVOURITE BOOK IN MARATHI . PLZ IIN MARATHI MARATHI MARATHI​

Answers

Answered by priyanshu133882
2

this is your answer picture

Attachments:
Answered by ravitavisen
112

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी

उलट आई कौतुकाने सांगते, “आमच्या बाळ्याचा सुट्टीत काही त्रास नसतो. तो आणि त्याची पुस्तके." खरोखर पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतही नाही. या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली. या सर्व पुस्तकांत एका पुस्तकाने माझ्या मनात कायमचे स्थान मिळविले आहे. ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांचे 'जेव्हा माणूस जागा होतो ."

या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता, म्हणून ते वाचावयाचे असे मी ठरविले होते पण ग्रंथालयात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले. जेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि वाचावयास सुरुवात केली तेव्हा त्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचल्यानंतरच मी ते खाली ठेवले. नंतरही दोन वेळा मी ते पुस्तक वाचले.

'जेव्हा माणूस जागा होतो...' ही काही एखादी कादंबरी नाही, किंवा काव्यसंग्रहही नाही. तरी देखील ते पुस्तक आपल्या मनाला भिडते. कारण ती एक सत्यकथा आहे. एका वसाहतीची ती हृदयस्पर्शी कहाणी आहे. या पुस्तकाची लेखिका प्रस्तावनेतच सागून टाकते की, ती काही स्वतः नाणावलेली लेखिका नाही. तरी पण हे पुस्तक उत्कृष्ट उतरले आहे. कारण त्या कादंबरीतील क्षणन् क्षण लेखिका स्वतः जगली आहे

लेखिका गोदावरी परुळेकर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले. पण कॉ. परुळेकरांबरोबर राजकीय-सामाजिक कार्य करताना त्यांना या डोंगरकपारीतील आदिवासींची व्यथा जाणवली; त्यांची गुलामावस्था पाहिली म्हणून त्यांनी त्यांच्यातील माणूस जागा केला. या आपल्या साऱ्या कामगिरीचा वृत्तान्त त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे-अगदी साध्या, सोप्या, रसाळ भाषेत.

आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे, हे सांगताना त्यांनी कोंड्याची भाकर व अंबाडीच्या भाजीचे केलेले वर्णन आपल्याला खूप काही सांगून जाते. चहा कसा करतात हेही त्या वारल्यांना माहीत नव्हते. 'लग्नगडी' व 'वेठीच्या आसा'चा फेरा या परंपरागत रूढी म्हणजे जमीनदारांच्या निपुणतेचा पुरावाच आहे. लेखिकेला पहिले काम करायचे होते ते आदिवासींच्या मनातील दुबळेपणा काढून टाकायचे. वर्षानुवर्षांचा जुलमी छळ अंगवळणी पडल्यामुळे ते दुबळे झाले होते;

त्यांचा आत्मविश्वास हरवला होता. लेखिकेने त्यासाठी त्यांना संघटित केले. त्यांच्यातील आत्मविश्वास फुलविला. पुस्तकाच्या अखेरीस हाच आदिवासी ‘खऱ्या अर्थाने माणूस' होऊन जमीनदारांच्या विरुद्ध बंड करावयास उभा ठाकलेला आपल्याला दिसतो.

 \fbox \red{Hope} \fbox \orange{ it} \fbox \green{ helps} \fbox \blue{ you} \fbox \pink{ :)}

तुम्ही महाराष्ट्रातील आहात का?

Similar questions