English, asked by rish4578, 1 year ago

Please la want small essay on holi in marathi

Answers

Answered by vyshnavireddy
8

होळी वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले.

Answered by Anonymous
14
"होळी"

होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला (मार्च महिन्यात) येतो. महाराष्ट्रात होळीला शिमगा म्हणतात. हा सण दोन दिवस साजरा करतात.

पहिल्या दिवशी सगळे सारवून मध्यभागी एखाद्या झाडाची मोठी फांदी रोवून त्याभोवती लाकडे, गोवऱ्या व गवत रचून होळी तयार करतात. होळीभोवती रांगोळी काढून तिला फुलांच्या माळांनी सजवतात.

होळीची पूजा करतात. मध्यरात्री होळी पेटवतात होळी पेटवताना मोठ्याने बोंब ठोकतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात व होळीत नारळ टाकतात. होळी ही हुताशनी देवी आहे. ती होळीबरोबर सर्व वाईट गोष्टींचा नाश करते, असा समज आहे.

होळीच्या दुसऱ्या दिवशी 'धूलिवंदन' साजरे करतात. त्या दिवशी रंग व गुलाल उडवण्याचा खेळ खेळतात. एकमेकांवर रंग उडवण्यात मौज वाटते. दोन्ही दिवशी गोड जेवण करतात.

होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा केला जातो.
Similar questions