PLZ answer in marathi
Answers
Answer:
१. रूपाली रामदास रेपाळे:
79
१२ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय मुलगी. १५ ऑगस्ट १९९४ रोजी तिने १६ तास व ७ मिनिटांत खाडी पोहून पूर्ण केली. तिने आतापर्यंत जिब्रल्टर, पाल्क, धरमतर यांसारख्या ७ खाड्या पोहून पार केल्या आहेत. रूपालीला सागरकन्या, डॉल्फिन क्वीन या नावांनीही ओळखले जाते.
२. वीरधवल खाडे:
जलतरणासाठी ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेला सर्वांत तरुण जलतरणपटू. २००८ साली त्याने बीजिंग येथे ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर जलतरण स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी दाखवली. २०१० साली त्याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्याने अनेक पदके, पुरस्कार मिळवले आहेत.
३. प्रसन्ता कर्माकर:
शारीरिक अपंगत्वावर मात करून जलतरणात पदक मिळवणारा तरुण. २००९ मध्ये अर्जेंटिनाच्या विश्व जलतरण स्पर्धेत त्याने उत्तम यश मिळवले. २००९ साली ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदके त्याने मिळवली आहेत. ह्या महान खेळाडूला 'अर्जुन पुरस्कार', 'कोलकाता श्री पुरस्कार', 'मेजर ध्यानचंद पुरस्कार' यांसारखे विविध पुरस्कार मिळाले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये त्याचे नाव लिहिले गेले आहे.
४. शिखा टंडन:
वयाच्या १२ व्या वर्षी २ राष्ट्रीय जलतरण स्पर्धांत कांस्य
पदके मिळवणारी जलतरणपटू. वयाच्या १६ व्या वर्षी पहिली विश्वविजेती जलतरणपटू होण्याचा मान पटकावला. सलग ३ वर्षे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तिचा गौरव झाला. १४६ राष्ट्रीय, तर ३६ आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील पदके तिने मिळवली आहेत.