India Languages, asked by sakina53, 11 months ago

plz answer this questions in marathi..... ​

Attachments:

Answers

Answered by minal85
1
१) व्यामाचे महत्त्व

लहान, मोठे सर्वांनी व्यायाम केला पाहीजे. व्यायामुळे आपले शरीर मजबूत होते. मजबूत शरीरात मजबूत मन तयार होते. व्यायामामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. हाडे व स्नायू बलवान होतात. चेहरा तेजस्वी होतो. मन शांत राहते. आजच्या युगात फास्टफूडमुळे तब्येत खराब होते, त्यावर व्याम हा चांगला उपचार आहे. स्वभावात नियमितपणाही येतो. शरीर जास्त अशक्त वा लठ्ठ बनत नाही.

२) चांगल्या सवयी

चांगले दिसण्याबरोबरच चांगल्या सवयी असणेदेखील महत्तवाचे असते. मग चांगल्या सवयी कोणत्या म्हणता येतील? अशा वयी ज्यांच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. व्यक्तीच्या सवयींवरूनच त्याची ओळख समाजाला होते. जर एखादा मुलगा किंवा मुलगी खूप छान दिसते, पण तो किंवा ती खूप वाईट विचार करते, वाईट वागते, दुसर्यांना वाईट सल्ला देते ; तर ती व्यक्ती समाजाला नकोशी वाटते. पण जर एखादी व्यक्ती सर्वांशी चांगले वागते, चांगले बोलते, चांगल्या सवयींचे अनुकरण करते तर ती व्यक्ती समाजात मान-सन्मान मिळवते.

३) योग्य आहार

आपल्या शरीरासाठी योग्य आहार गरजेचा असतो. योग्य म्हणण्यापेक्षा 'संतुलित आहार' गरजेचा असतो. संतुलित आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ हे योग्य प्रमाणात शरीरास पुरवली जातात. त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. जर आपल्या आहारात फास्टफूडचे प्रमाण अधिक झाले तर त्याचा आपल्या पचनसंस्थेवरदेखील परिणाम होतो. म्हणून सर्वांनी 'निरोगी' राहण्यासाठी योग्य आहार घेतलाच पाहिजे.




Please mark me as a brain liest
Similar questions