poem on cow in marathi
I want it quickly
Answers
I HOPE THIS WILL HELP YOU......
गाय वासरू ही प्रशांत शिंदे लिखित एक सुंदर रचना आहे.
कधी काळी गाय वासरू नका विसरू
निवडणूक प्रचारातली आरोळी होती
सारी प्रजाच त्या आरोळीने
गारद होऊन गोपीसम गुंगत होती
काळ बदलला प्रजा बदलली
सारी राज कारणांची गणित बदलली
चिखल झाल्या राज कारणाने
नवं युगासाठी जणू कात टाकली
चिखलातून त्या कमळाने मग
स्वताकतीने डोके वर काढले
पहाता पहाता सारे राजकारण
कमळमय होऊन डोलू लागले
बदल निसर्गाचा नियम आहे
हे एका चहा वाल्याने दाखवून दिले
जगानी साऱ्या त्याचे आनंदाने
मोठ्या दिलाने आनंदात स्वागत केले
पुन्हा एकदा हिंदुत्वाची मशाल पेटली
कमळाची त्या अभा विश्वव्यापी ठरली
उरली सुरली सत्ता सुद्धा गाय वासरूची
पहाता पहाता जनमानसात विरून गेली
पूजनीय गाय वासरू मात्र
वंदनिय होऊन बसले
कमळाचे नशीब कसले हे
गाय वासरूच्या पूजनाने दिसले
विदेशी गाय गरीब नाही हे
आता आम जनतेला पटले
वासारा साठी तिने पहा
जंग जंग कसे पछाडले
चरायला गेलेले वासरू
आशीर्वादासह चारधाम फिरून आले
येता येता संगे यशाची
गुरुकिल्ली खिशातून घेऊन आले
कुंपणात मान घुसऊन
शिवारी पाय भक्कम केले
एवढ्यावरच पहा कसे वासरू
उद्याचे स्वप्न रंगवू लागले....!