India Languages, asked by ssaiarpan9887, 9 months ago

pralayankari paus in marathi nibandh

Answers

Answered by manishthakur100
12

Answer:

Heyyy,

Here is your Answer

'ये रे, ये रे पावसा' म्हणून स्वच्छंदाने बागडणारी लहान मुले ज्याचे स्वागत करतात तो पाऊस! शेतकरी दोन-दोन डोळ्यांनी ज्याची वाट बघत असतात तो पाऊस! प्रौढ वयातील माणसाच्या अंगाचा दाह ज्याच्या शीतल स्पर्शाने शांत होतो तो पाऊस! चराचर सृष्टीला नवचैतन्य प्राप्त करून देणारा पाऊस! या पावसाची सौम्य आणि रौद्र अशी दोन रूपे मनाला सारखीच वेड लावतात

पावसाचे सौम्य रूप नेहमीच आनंददायक वाटते. शाळेची मे महिन्याची सुटी संपून मुले जेव्हा नवजोमाने शाळेत जाण्यास उत्सुक असतात, तेव्हा हा पाऊस नेमकी आपली हजेरी लावून मुलांची व त्यांच्या पालकांची धांदल उडवून देतो. डोक्यावरची छत्री, अंगावरील रेनकोट, टोपी, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून घातलेले जाकीट या सर्वांच्या दर्शनाने रस्त्यावरून चालताना एक वेगळाच अनुभव मुले अनुभवत असतात.

हाच आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही पाहवयास मिळतो. नांगरणी, पेरणी करताना शेतातील पावसामुळे झालेला चिखल पायी तुडवताना त्याला त्रासदायक वाटत नाही. या पावसातच पिकाची, भविष्याची स्वप्ने तो पाहत असतो. तो मनोमन सुखावतो. Read also : माझा आवडता ऋतू : वर्षा ऋतू मराठी निबंध

वडीलधारी माणसे कामावर जाताना अगर घरात बसल्या बसल्या या पावसाचे आनंदाने स्वागत करताना दिसतात. चराचर सृष्टीही हर्षोत्फुल्ल होऊन आनंदाने डोलू लागते. निसर्गातील या सृष्टीचे वर्णन अनेक लेखकांनी आपापल्या भाषेत केलेले आढळते.

असा हा पाऊस थोरा-मोठ्यांच्या, लहानांच्या आशा-आकांक्षा पल्लवित त्यांना दिलासा देतो. मने प्रफुल्लित करतो. जीवनाला सार्थकता देतो. वसुंधरेच्या घरी चार महिने पाहुणा आलेला हा पाऊस आपल्या सौम्य स्वरूपाने, शात प्रवृत्तीने, कृपाकटाक्षाने वसुधरेच्या दारात वैभवाच्या पायघड्या घालतो व वसुंधरेला धान्य, फळफळावळ, भाजीपाला यांचा आहेर देऊन, रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ तिच्या स्वाधीन करतो व तिचे स्वागत करून तिचा निरोप घेत निघून जातो. वसुंधरा या पाहुण्याकडे कुतूहलाने पाहत राहते पुन्हा येण्याची त्याची वाट बघत.

पावसाचे हे सौम्य रूप सर्वांनाच हवेहवेसे वाटते.

पण या पावसाचे रौद्र रूप मात्र नकोसे होते. पावसाची संततधार कोणालाच आवडत नाही. मुलांना खेळता येत नसल्यामुळे ती या पावसावर नाराज असतात. सतत दीर्घकाळ पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवतो. उभ्या असलेल्या पिकाची नासाडी पाहताना त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. नद्या, नाले, ओढे भरभरून वाहताना सर्वसामान्य माणूस धास्तावलेला असतो. आपल्या घराची होणारी पडझड तो उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. क्षणाक्षणाला आता काय होईल, या चिंतेत पावसाचे उग्र स्वरूप त्याच्या छातीत धडकी भरवते. काळ्याकुट्ट मेघांनी व्यापलेले आकाश आणि पावसाच्या धारांचा वर्षाव प्रलयकाळच्या भययुक्त वातावरणाची आठवण करून देतो व केव्हा एकदा हा पाऊस थांबेल याची वाट बघत भेदरलेली धरणी जणू मौनच धारण करते.

मानवी व्यवहाराचे सारे बंध या पावसाच्या हातात आहेत. या पावसाला 'निसर्गातील अनभिषिक्त बादशहा' असे म्हटले, तर काय हरकत आहे?

Similar questions