India Languages, asked by up431468, 1 day ago

prasang lekhan 9th std

Answers

Answered by snehamhetre05
0

Answer:

hope it was helpful pls mark me as brainliest.

Explanation:

स्वच्छ सुंदर शाळा

विविध स्पर्धांचे नियोजन होऊन एकेका शिक्षकावर ती जबाबदारी सोपवण्यात आल्याने शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढला. विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. वर्ग सजावट झाली, सुविचारांनी फळे सजले. काचपेट्यांमध्ये सुंदर चित्रे (विद्यार्थ्यांनी काढलेली!) नटली.

शाळेत नियमित येणाऱ्या, गुणी विद्यार्थ्यांचा प्रार्थनेच्या वेळी आवर्जून उल्लेख होऊ लागला. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी, शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त वेळ देऊन शिक्षक खास प्रयत्न करू लागले. तसे वर्षभरच आमचे शिक्षक इ. १०वीच्या विद्यार्थ्यांना शाळा भरण्यापूर्वी तासभर विशेष मार्गदर्शन करतातच. गेल्या १० वर्षांपासून हे प्रयत्न होत आहेत. त्याचे चांगले परिणामही दहावीच्या निकालावर दिसून आले आहेत.

मातृभाषेचे महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने मिलिंद सोनार यांनी रचलेली प्रतिज्ञा आवर्जून म्हणण्याचा प्रघात मा. मुख्याध्यापकांनी सुरू केला. दररोज आमचे शिक्षक मूल्यसंस्कार जपणाऱ्या गोष्टी (रोज एकजण) सांगतात. वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून पुस्तकपेटी तयार केली, जी आमच्या ऑफ तासाला न कंटाळता वर्गात आणली जाते. मुले ही पुस्तके आवडीने वाचतात. शाळा सुटल्यावर एका जिन्याने मुले आणि एका जिन्याने मुली बडबड न करता हात मागे बांधून ओळीत, शिस्तीने उतरू लागले. अर्थात या सर्व गोष्टींसाठी शाळेतील प्रत्येक शिक्षकांना लक्ष घालावेच लागले. या सर्व गोष्टींवर मा. मुख्याध्यापकांची प्रेमळ; पण करडी नजर असे.

सफाई कर्मचारी, शिपाई आणि रखवालदार यांनाही आपापल्या कामाचा भाग समजावून दिल्याने त्यांनीही मनापासून काम केले.

या सर्वांचा परिणाम म्हणजे आमच्या शाळेला मिळालेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस. पण मित्रांनो, मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगाविशी वाटते की, आज शाळेतील प्रत्येकालाच आपली जबाबदारी कळली आहे. त्यामुळे यावर्षीही विशेष प्रयत्न न करताच आम्ही बक्षीस मिळवू. कारण लागलेली शिस्त आम्ही बिघडू देणार नाही असा विश्वास आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणाऱ्या आमच्या शालेय प्रशासनाचे कौतुक झाले नसते तरच आश्चर्य!

Similar questions