Problems faced by farmers in marathi
Answers
Answer:
शेतीप्रश्नी समग्र दृष्टिकोन हवा.
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांची कर्जमाफी हे मुद्दे राज्यात कायम चर्चेत आहेत. निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन मते मागितली जातात, पण नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांची उपेक्षा थांबवण्यासाठी काय करणे शक्य आहे, याचा ऊहापोह करणारा लेख..
शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जमाफीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. शेती प्रश्नाची चर्चाही त्यामुळे गांभीर्याने होत आहे. अशा चर्चाना अधिक मूलभूत विचारांकडे व समग्र दृष्टिकोनाकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.
एका बातमीने हीच गरज आणखी अधोरेखित केली आहे. बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेची आणि एका आत्महत्येची. चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सुरू होण्यापूर्वी अवघा एक तास अगोदर तेथून आठ किलोमीटरवर असलेल्या भादुर्णी गावात कर्जबाजारीपणाला कंटाळून उमेद चायकाटे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. जाहीर सभेत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या समस्यांवर अत्यंत पोटतिडिकीने बोलत असताना या शेतकऱ्याचा मृतदेह मात्र चिंचेच्या झाडाला लटकत होता. मेल्यानंतरही या शेतकऱ्याची विटंबना थांबली नव्हती. पोलीस मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्यात गुंतले असल्याने या शेतकऱ्याचा मृतदेह चार तास चिंचेच्या झाडाला तसाच लटकत ठेवावा लागला होता. बातमी वाचून संवेदनशील मनाच्या कोणत्याही माणसाला गहिवरून येणे स्वाभाविक होते.