Geography, asked by dhanusg9296, 1 month ago

Pruthvi che chubakran ha parivalan ahe spasht kara

Answers

Answered by pinkikumari198101
1

Answer:

स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.

पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी बरोबर एक दिवसात अथवा २४ तासात एक फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. प्रति दिवशी हा फरक ८६,४००(२४ तासांचे सेकंद)/३६५.२५(एका वर्षातील दिवस) = ३ मिनिटे ५६ सेकंद एवढा असतो.

Similar questions