purgrastache manogat
Answers
■■ पूरग्रस्ताचे मनोगत■■
नमस्कार,मित्रांनो, मी राकेश कुमार,एक पूरग्रस्त बोलत आहे.पूराबद्दल कोणतीही बातमी ऐकल्यावर आज सुद्धा माझ्या अंगावर शहारे येतात.
माझ्या गावाचे नाव आहे सूखापुर. परंतु,चार वर्ष आगोदर,आमच्या हस्त्या खेळत्या गावात पूर आला आणि सगळे काही उद्धवस्थ झाले.
मला अजूनही ते दिवस नीट आठवतात. पावसाचे दिवस होते. तीन - चार दिवस सतत पाऊस पडत होते. पाऊस काही थांबतच नव्हते.
हळूहळू आमच्या घरासमोर अंगणात, रासत्यांवर पाणी साठू लागले. आम्ही सगळे लोक खूप घाबरलो होतो.आमच्या गावातली नदी पाण्याने पूर्ण भरून गेली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी नदीला पूर आले व आमचा पूर्ण गाव पाण्याने भरून गेला. माझे घर, माझ्या शेजाऱ्यांचे घर, गावातील दुकानं,मंदिर सगळ्यांमध्ये पाणी शिरू लागले.काय करू आणि काय नाही, अशी परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झाली होती.
खायचे अन्न पाण्यात वाहून गेल्यामुळे आम्ही उपाशी होतो.तेव्हा, सरकार आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी आम्हाला मदत केली. त्यांनी आम्हाला सुरक्षित जागेवर नेले. आमची खायची सोय केली.
जसेजसे दिवस गेले,तसेतसे पाऊस थांबू लागला आणि हळूहळू गावाची परिस्थिती सुधरू लागली.या गोष्टीला आता चार वर्ष झाली आहेत, पण तरीही याच्या आठवणी आम्हा सगळ्या पूरगरस्तांच्या मनात कायम आहेत.