Question No. 1
.सांगावा' या पाठाचे लेखक कोण?
Answers
sorry i dont now answer
anybody give answer to him
Answer:
सांगावा या पाठाचे लेखक शंकरराव खरात आहेत.
Explanation:
शंकरराव खरात यांनी लिहिलेल्या अनेक कथांपैकी 'सांगावा' ही एक अतिशय भावनिक अशी कथा आहे. 'सांगावा' या शब्दाचा अर्थ निरोप देणे किंवा समाचार पोहोचवणे असा होतो.
या कथेमध्ये गरीब मजुरांच्या वाट्याला त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखाचे वर्णन केलेले आहे. या कथेत रामा, शाहू बाई म्हणजे रामाची कारभारीन, कुंडलिक जाधव, द्रोपदामाई, व तिची मुलगी अंजनाबाई, हे महत्त्वाचे पात्र आहेत. रामाची कारभारीन व त्याचे पोर रामाची वाट बघत असतात, कारण घरात अन्न शिजवायला धान्याचा एकही कण नसतो. रामा जेव्हा घरी येतो तेव्हा पोर रामाला विचारतो, भाकरी आणली का? तेव्हा त्याला प्रश्न पडतो, पोराला काय उत्तर द्यावं. अशा परिस्थितीत कुंडलिक जाधव मळ्याची मालकीण द्रोपदा बाईच्या मृत्यूचा निरोप घेऊन येतो. सगळे काही न खाताच मळ्यावर जातात. थोड्यावेळाने कुंडलिक रामाला सांगतो, द्रोपदामाईच्या मृत्यू चा निरोप घेऊन तू तिची मुलगी अंजनाबाई च्या गावाला जा. तेव्हा रामाच्या डोक्यात विचार येतो, आज घरात चुल पेटली नाही. पोराच्या पोटात भुकेची ज्वाला पेटली आहे, विचारांचा कल्लोळ त्याच्या डोक्यात असतो. पण तशाच परिस्थितीत तो अंजनाबाई च्या गावाला सांगावा देण्यासाठी निघतो. भुकेने व्याकूळ असून देखील रामा जाण्यास तयार होतो, कारण त्याला कुंडलिकाने सांगितलेले असते की सांगावा पोहोचवून आल्यावर तुझ्या पोटाची खळगी भरतो.
अशाप्रकारे सांगावा या कथेमध्ये रामा हा पोटात भुकेची ज्वाला पेटत असताना आलेल्या परिस्थितीला सामोरे जातो. लेखकाने अतिशय भावनिक वर्णन आपल्या कथेच्या माध्यमातून केले आहे.