रेडीओ दुरदर्शन वर्तमानपत्रे इंटरनेट या चारही साधनांमध्ये कोणता फरक आहे ? please jaldi
Answers
Answer:
Explanation:
घरबसल्या जगाचा वृत्तान्त देणाऱ्या महाभारतकालीन संजयचा ‘दूरदर्शन’ हा दृश्य अवतार. महाभारतात एकाच महापुरुषाला ही कला वा विद्या अवगत असल्याचे सांगितले गेले आहे. (आणि त्यावर आजही बेटकुळ्या फुगवणारी मंडळी आपण पाहतो.) पण तंत्रज्ञान हे व्यक्तिसापेक्ष नसल्याने एकदा ते जगातल्या कुठल्याही मनुष्याला कळले की ते कुणालाही उपलब्ध असते आणि जगात कुठेही ते तंत्र तोच ठरलेला आविष्कार देते.
Television या शब्दाचा उगम ग्रीक शब्द TELE म्हणजे ‘दूरचे’ आणि लॅटिन शब्द Vision म्हणजे ‘दृश्य’ या दोन शब्दांच्या संगमातून झाला आहे आणि त्याला अतिशय समर्पक भारतीय नाव आहे- दूरदर्शन. १९२० साली यांत्रिकी करामतीमधून सुरू झालेला याचा प्रवास आज त्रिमिती प्रतिमा दाखवणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रापर्यंत झाला आहे. केवळ पृथ्वीवरच्याच नव्हे, तर अवकाशातल्या परग्रहांवरच्या हालचालीसुद्धा आपण घरबसल्या पाहू शकतो आहोत ते याच तांत्रिक प्रगतीमुळे. २०१३ च्या आकडेवारीनुसार, जगातील ७९ % लोकांकडे दूरदर्शन संच होता. अशा या सर्वव्यापी, लोकप्रिय तंत्रज्ञानाचे मूळ १८८४ मध्ये पॉल निकोवने शोधलेल्या तबकडीमध्ये आहे.
निकोवने या प्रयोगातून प्रतिमा प्रवास करू शकते, हे सिद्ध केले. चित्र क्र. १ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याने एक तबकडी (पत्रा/ पुठ्ठा) घेतली आणि त्याच्यावर एककेंद्री वर्तुळे आखली. प्रत्येक दोन वर्तुळांमध्ये एक अशी एकाच व्यासाची किंवा चौरस आकाराची समान अंतरावर असलेली छिद्रे पाडली. या छिद्रांना जोडले असता ते एक सर्पिल (spiral’) तयार करतील अशी रचना केली. त्यानंतर चित्र क्र.२ मध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्या तबकडीसारखीच हुबेहूब दुसरी तबकडी घेऊन त्यामध्ये अडथळा तयार केला. पहिल्या तबकडीसमोर एक वस्तू ठेवली आणि तबकडीमागे एक प्रकाश संवेदक ठेवला. दुसऱ्या तबकडीच्या अलीकडे दिवा ठेवला आणि पलीकडे पडदा ठेवला. दोन्ही तबकडय़ा एकाच गतीने आणि एकाच दिशेने फिरवल्या असता पहिल्या तबकडीसमोरील वस्तूवरून परावर्तित होणारा प्रकाश तबकडीवरील भोकामधून संवेदकावर पडला. संवेदक त्याच्यावर पडलेल्या प्रकाशाला प्रतिसाद देऊन विद्युत स्पंद प्रसारित करू लागला. या स्पंदांनी तयार केलेल्या विद्युत्प्रवाहामुळे अडथळ्यापलीकडील तारेने जोडलेला दिवा लागला. तो प्रकाश दुसऱ्या फिरत्या तबकडीवरील भोकांमधून पडद्यावर पडल्याने वस्तूची प्रतिमा दिसू लागली. संवेदक जरी प्रकाश आणि अंधार बघत असला आणि तुकडय़ा-तुकडय़ाने येणाऱ्या प्रतिमा टिपत असला, तरी तबकडीच्या वेगामुळे याची वारंवारिता जास्त असल्याने सलग प्रतिमेचा परिणाम साधता येतो. तयार होणारी प्रतिमा प्रकाशाच्या रेषांनी तयार होत असते. पुढे यात अतिवेगाने बदल होत गेले तरी दूरदर्शनच्या पडद्यावरील प्रतिमा ठिपके आणि रेषांनीच बनत राहिली आहे.
या तंत्रावर आधारित पहिले दूरदर्शित प्रकाशचित्र जॉन लोगी बेअर्ड या शास्त्रज्ञाने १९२६ मध्ये लंडनमध्ये प्रसारित केले. तर १९२७ मध्ये त्याला लंडनमधून ७०५ कि. मी. अंतरावरील ग्लासगोमध्ये दृश्य पाठवता आले. यात पुढे विकसित तंत्र वापरून जास्त अंतरावर, अधिक स्पष्ट आणि अधिक बारकावे दिसणाऱ्या (ऌ्रॠँ फी२’४३्रल्ल) प्रतिमा प्रक्षेपित होऊ लागल्या. लवकरच ३० रेषांनी तयार होणारी प्रतिमा १८० रेषांपर्यंत वाढत गेली आणि चित्रे अधिकाधिक स्पष्ट होत गेली.
यांत्रिकी तंत्रावरील दूरदर्शन विकसित होत असतानाच कॅथोड रे टय़ूबचे (उफळ) तंत्रज्ञानही बाजारात येऊ लागले. १८९७ मध्येच फर्डिनांड ब्राऊनने उफळ चा शोध लावला, ज्यामुळे कॅथोड किरण विस्थापित करणे शक्य झाले. १९०७ मध्ये रशियन शास्त्रज्ञ रोसिंगने प्रथम ही नलिका दूरदर्शन-संकेतग्रहणासाठी वापरली आणि दूरदर्शन तंत्रज्ञान उफळ चा वापर करून नवीन स्वरूपात विकसित होत गेले. १९४० पर्यंत यांत्रिकी दूरदर्शन व्यवस्था पूर्णपणे विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात रूपांतरित झाली आणि लोकांना ६२५ रेषांनी तयार होणारे चित्र त्यांच्या पडद्यावर दिसू लागले.
दूरदर्शन, संगणक अशा अनेक यंत्रांचा प्राण असलेली ही कॅथोड किरण नलिका (उफळ) काय आहे, ते आधी पाहू. चित्र क्र. ४ मध्ये कॅथोड किरण नलिकेचे (उफळ) संकल्पना-चित्र दाखवले आहे. या नलिकेमध्ये असणाऱ्या कॅथोडमधील धातूची तार गरम झाल्यावर इलेक्ट्रॉन बाहेर फेकू लागते. या इलेक्ट्रॉनचा झोत ऋणभारित (-५ी) असल्याने तो अॅनोडकडे खेचला जातो. या नळीत दोन कामे करणारे अॅनोड बसवलेले असतात. एक संच इलेक्ट्रॉनची गती वाढवतो, तर दुसरा संच त्या झोताला विस्थापित करतो. काही इलेक्ट्रॉन उभ्या अंगांनी विस्थापित होतात, तर काही आडव्या अंगांनी दिशा बदलतात. यामुळे इलेक्ट्रॉनचा झोत नळीच्या तोंडाशी असलेल्या पारदर्शी पडद्यावर सगळीकडे पसरतो. पडद्याला आतील बाजूने फॉस्फरसचा थर दिलेला असतो. इलेक्ट्रॉनचा फॉस्फरसशी संपर्क आल्याबरोबर ते कण चमकू लागतात आणि पडदा प्रकाशित होतो.
दूरदर्शनच्या तंत्रज्ञानात मानवी मेंदूच्या दोन क्षमता वापरल्या जातात. पहिली क्षमता म्हणजे अनेक ठिपक्यांपासून बनलेली आकृती मेंदू ‘वाचताना’ अखंड चित्र म्हणून वाचू शकतो. चित्र क्र. ५ मधील मुलाचे चित्र जरी अनेक चौकोनांपासून बनलेले असले तरी आपण ते जरा लांबून बघितले तर मुलाचा चेहरा बघू शकतो. आणि दुसरी क्षमता म्हणजे दृष्टीसातत्याचा नियम. वेगाने सरकणारी स्थिरचित्रे मेंदू एकत्र जुळवून त्यापासून हलणारे चित्र ‘बघू’ शकतो. या क्षमता आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ करताना दूरदर्शनमध्ये काय होते, तर.. दूरदर्शन कॅमेऱ्यासमोरील घटनेचे दृश्य आणि श्राव्य संकेत तयार करतो. प्रक्षेपक ते संकेत हवेत सोडतो आणि संग्राहक ते संकेत पकडतो आणि दूरदर्शन संचात त्याचे पुन्हा कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनेच्या प्रतिमेत रूपांतर होते. हे संकेत आपल्यापर्यंत वेगाने येणारी स्थिरचित्रे पोहोचवत असतात. आणि त्यांच्या वेगामुळेच आपण सलग हलते चित्र पाहू शकतो.
रेडीओ दुरदर्शन वर्तमानपत्रे इंटरनेट या चारही साधनांमध्ये कोणता फरक आहे ?
याचे उत्तर असे आहे
समानता...
रेडिओ आणि दूरदर्शन ही दोन्ही इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाची माध्यमे आहेत. दोन्ही सार्वजनिक संवादाचे माध्यम म्हणून वापरले जातात. रेडिओ आणि दूरदर्शन हे दोन्ही माहिती, बातम्या आणि मनोरंजनाचे स्रोत आहेत.
अंतर...
रेडिओ हे श्रवण माध्यम आहे, तर दूरदर्शन हे दृश्य आणि श्रवण माध्यम आहे. रेडिओवरून माहिती, बातम्या इत्यादी ऐकूनच मिळवता येतात. तर दूरदर्शनवर पाहता येईल तसेच ऐकता येईल.
आजच्या काळात रेडिओपेक्षा टेलिव्हिजन अधिक लोकप्रिय आहे।
वर्तमानपत्रे
वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्र हे बातम्यांवर आधारित प्रकाशन आहे, मुख्यतः चालू घडामोडी, राजकारण, क्रीडा, व्यक्तिमत्व, जाहिराती इत्यादी माहिती स्वस्त कागदावर छापली जाते. दळणवळणाच्या साधनांमध्ये वृत्तपत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. वृत्तपत्रे साधारणपणे रोजची असतात पण काही वर्तमानपत्रे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि सहामाही असतात. बहुतेक वर्तमानपत्रे स्थानिक भाषांमध्ये असतात आणि स्थानिक विषयांवर लक्ष केंद्रित करतात.
इंटरनेट
इंटरनेट हे शिकण्याचे स्त्रोत आहे इंटरनेट हे माहितीच्या सर्वात मोठ्या भांडारांपैकी एक आहे, ज्यामुळे ते एक...
इंटरनेट हे संप्रेषणाचे साधन आहे इंटरनेट हे संप्रेषणाचे एक अत्यंत मौल्यवान स्त्रोत आहे. तुम्ही लोकांशी कनेक्ट होऊ शकता...
इंटरनेट मनोरंजन प्रदान करते इंटरनेट आता जगभरातील मनोरंजनाच्या सर्वात लोकप्रिय स्त्रोतांपैकी एक आहे.
आजच्या दिवसात आणि युगात इंटरनेट हे एक उत्तम संशोधन साधन आहे, माहिती सर्वत्र आहे परंतु आपल्याला कोणाची तरी गरज आहे...
know more about it
https://brainly.in/question/37599507?
https://brainly.in/question/23733309