३) रेडिओजॉकी या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढण्याची तुम्हांला जाणवणारी कारणे लिहा.
Answers
Answer:
आधुनिक जीवनात संपर्क साधण्यासाठी मानव विविध जनसंपर्क माध्यमांचा वापर करत असतो. यामध्ये मुद्रित, श्राव्य
आणि दृक्-श्राव्य या तीन प्रमुख माध्यमांद्वारे समाजाशी संपर्क साधणे शक्य झाले आहे.
श्राव्य माध्यमात आकाशवाणी, दूरध्वनी, ध्वनिफिती इत्यादींचा समावेश होतो.
या सर्व माध्यमांची प्रमुख वैशिष्ट्ये हे समाजसंपर्क साधनांद्वारे वैचारिक दळणवळण, लोकांचे मनोरंजन, उदबोधन, मार्गदर्शन, विविध क्षेत्रांतील माहितीचे संकलन व वितरण इत्यादी होत असते.
Explanation:
आकाशवाणीमध्ये कार्यक्रमाचे ओघवत्या व प्रभावी शैलीत निवेदन करणाऱ्याला रेडिओजॉकी किंवा आरजे असे संबोधतात.
रेडिओजॉकीचे कार्यक्षेत्र आज प्रचंड वाढत असल्यामुळे क्षेत्राशी संबंधित नवनवीन पर्याय आज खुले होत आहेत. यामध्ये एफ. एम., ए. एम. वरील जॉकी, विविध सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी सुसंवाद साधणारा, चर्चा करणारा रेडिओजॉकी, खेळांविषयी संवाद साधणारा स्पोर्टस जॉकी तसेच अंतराळ, उपग्रह रेडिओजॉकी
देखील उपलब्ध आहेत. तसेच रेडिओजॉकी हा एखाद्या समस्येवर स्पष्टपणे आणि परखडपणे बोलू शकतो किंवा प्ले करू शकतो.
रेडिओजॉकी हे आपल्या उत्कृष्ट संवाद कौशल्यातून लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करून ते प्रकाश आणत असतात. तसेच त्यांच्या मानभाऊक आणि धीराच्या अशा बोलण्यामुळे लोकांचे बरेच टेन्शन दूर होत असते न त्यामुळे लोक आवर्जून ऐकतात. लोकांचा प्रतिसाद वाढत असल्यामुळे रेडिओजॉकीचे कार्यक्षेत्राची वाढत चालले आहे.