राज्य सरकारने प्लास्टिक बन्दी लागू केली या विषयवर बातमी तयार करा
Answers
उत्तर :-
बातमी लेखन-
महाराष्ट्र राज्य सरकारचा कौतुकास्पद निर्णय "प्लास्टिक बंदी"
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. 22 महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने पर्यावरणाच्या हिताच्या,संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणातील सर्व सजीव घटकांचा विचार करून त्यांच्या संरक्षणासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरेल.
महाराष्ट्र राज्य सरकारने जून 2018 पासून प्लास्टिक बंदी केली आहे. प्लास्टिक बंदी बाबत अधिसूचना दिनांक 23 मार्च रोजी जारी करण्यात आली होती.
राज्य सरकार या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसून येत आहे. प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास तसेच दुकानदार प्लास्टिक वापरत असेल तर महाराष्ट्र नॉन बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल ऍक्ट नुसार रोख रक्कम रुपये 5000\- दंड भरावा लागेल. आतापर्यंत एकंदरीत लाखो रुपयांचा दंड राज्यामध्ये वसूल करण्यात आला आहे.
नागरिकांना पर्यावरण मंत्री श्री कदम यांनी आवाहन केले की या निर्णयाचे मनापासून स्वागत करावे तसेच कायद्याची अंमलबजावणी करावी.
ANSWER IS IN ATTACHMENT
HOPE IT HELPS YOU
MARK AS BRAINLIST