Environmental Sciences, asked by joeltjenny6059, 1 month ago

राळेगण सिद्धीची यशोगाथा त्यांनी साध्य केलेल्या शाश्वत विकासाच्या उदिद्ष्टासहित लिहा मराठी मध्ये

Answers

Answered by srnroofing1717
5

Answer:

राळेगण सिद्धी - आदर्श भारतीय खेडे

महाराष्ट्रातील अहमदनगर तालुक्यातले राळेगण सिद्धी हे एक खेडे. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, बेकारी अशा गोष्टी तिथे होत्याच. ह्याच खेड्यातील एक रहिवाशाचे नाव होते अण्णा हजारे. १९७५ साली लष्करी सेवेमधून निवृत्त होऊन अण्णा राळेगण सिद्धीला परतले तेव्हा त्यांनी सर्व गावकर्‍यांना सोबत घेऊन राळेगण सिद्धीचे रूप पालटण्याचा निश्चय केला.

आज इतर प्रत्येक खेड्याच्या तुलनेमध्ये राळेगण सिद्धी हे 'आदर्श खेडे' मानले जाते. इथे आज मोठ्या प्रमाणात झाडे लावली गेली आहेत व टेकड्यांवर विशिष्ट प्रकारे बांधबंदिस्ती करून वाहून जाणार्‍या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबवली गेली आहे. पावसाचे हे पाणी साठवून वापरण्यासाठी इथे मोठे बांधीव कालवे तयार केले आहेत. ह्यामुळे ह्या भागातील भूजल-पातळी लक्षणीयरीत्या उंचावली असून कोरडी पडलेली विहीर अथवा कूपनलिका (बोअरवेल) दिसत नाही. पूर्वी दरवर्षी जेमतेम एक पीक हाती येत असे तर आता इथे वर्षाला तीन पिके घेतली जातात.

अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये राळेगण सिद्धीने मोठी मजल मारली आहे ह्यात शंकाच नाही. रस्त्यांवरचे दिवे सौरऊर्जेवर चालवले जातात - प्रत्येक दिव्याला स्वतंत्र पॅनल आहे. सर्व स्वच्छतागृहे व शौचालये येथील ४ मोठ्या बायोगॅस सयंत्राना जोडलेली आहेत. पाणी उपसण्यासाठी एक मोठी पवनचक्की आहे. एवढेच नाही तर घराघरांतदेखील स्वतंत्र बायोगॅस सयंत्रे आढळतात. हे एक स्वयंपूर्ण खेडे आहे.

Explanation:

[tex]\huge\colorbox{cyan}{••Thank you••}

Answered by Mbappe007
8

Similar questions