India Languages, asked by TransitionState, 1 year ago

रामनवमी मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख

Answers

Answered by mitu6211
2

Answer:

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम ह सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

Answered by halamadrid
1

Answer:

चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच चैत्र महिन्यातील नवव्या दिवशी श्रीराम यांचा जन्म आयोध्यात झाला होता.म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो.

भगवान रामाच्या मूर्तीला स्नान घालून,नवीन वस्त्र घालून,तिला पाळण्यात ठेवून, पाळणा हळवला जातो.भक्तजण मूर्तीवर फुले उधळवतात.मूर्तीची पूजा केली जाते.रामजन्माचा पाळणा म्हटला जातो.मंदिरामध्ये भजन,कीर्तन,प्रवचन व रामकथा केले जाते.काही मंदिरांमध्ये महाप्रसाद ठेवले जाते.या दिवशी लोक उपवास करतात.फळ आणि काही गोड खाऊन मध्यरात्री हे उपवास सोडले जाते.

काही ठीकाणी श्रीरामांचा पालखी सोहळा आयोजित केला जातो.भक्तजण या पालखी सोहळ्यात उत्साहाने भाग घेतात.श्रीराम,सीता,हनुमान व लक्ष्मण यांच्या मूर्त्या सजवलेल्या रथात ठेवल्या जातात आणि त्यानंतर पालखी काढली जाते.काही ठिकाणी रामलीला कार्यक्रम ठेवले जाते.

अशा प्रकारे मोठ्या उत्साहाने हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

Explanation:

Similar questions