Social Sciences, asked by rauts9123, 11 months ago

राष्ट्रीय अभिलेखागाराविषयी
माहिती लिहा​

Answers

Answered by GamerDrama12
1

Answer:

Explanation:

राष्ट्रीय अभिलेखागार एक गैर-सरकारी सरकारी विभाग है। इसका मूल विभाग यूनाइटेड किंगडम के ग्रेट ब्रिटेन और उत्तरी आयरलैंड के डिजिटल, संस्कृति, मीडिया और स्पोर्ट के लिए विभाग है।

Answered by varadad25
4

Answer:

राष्ट्रीय अभिलेखागार : नवी दिल्ली

Explanation:

१. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात.

२. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते.

३. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करण्यास मदत होते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवता येतो.

४. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार 'नवी दिल्ली' 'येथे आहे.

५. हे अभिलेखागार आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे.

६. भारतातील सर्व महत्त्वाची ऐतिहासिक दस्तऐवज येथे जतन करून ठेवले जातात.

भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराचा इतिहास:

१. भारतात १८९१ मध्ये पहिले अभिलेखागार निर्माण झाले.

२. हे अभिलेखागार कोलकाता येथे स्थापन करण्यात आले.

३. त्या काळात त्याचे नाव 'इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट' असे होते.

४. १९११ मध्ये कोलकाता येथील हे अभिलेखागार नवी दिल्ली येथे हलविण्यात आले.

५. १९९८ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती 'के. आर. नारायण' यांनी या अभिलेखागाराला 'राष्ट्रीय अभिलेखागार' म्हणून घोषित केले.

६. या अभिलेखागाराचे काम भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत केले जाते.

७. या अभिलेखागारात अठराव्या शतकापासूनची सर्व कागदपत्रे जतन करून ठेवली आहेत.

Similar questions