राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार mahiti
Answers
Answer:
नवी दिल्ली : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी सन २०२०चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (National Sports Awards 2020) विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठता वाखाणण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी प्रतिवर्षी क्रीडा पुरस्कार दिले जातात. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासह पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna Award) जाहीर करण्यात आला आहे. चार वर्षे क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देण्यात येत असतो. रोहित शर्मा याच्यासोबतच पॅरा अथलेटिक्स मरियप्पन टी. (Mariyappan T), टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manik Batra), कुस्तीपटू कु. विनेश (Ms Vinesh) आणि हॉकीपटू राणी (Ms Rani) यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासोबतच यंदाच्यावर्षी २७ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौवरण्यात येणार आहे. चार वर्षे सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार दिला जातो. द्रोणाचार्य पुरस्कार दोन श्रेणींमध्ये १३ खेळाडूंना जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू तयार करणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येतो. १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.