India Languages, asked by suhaspawar1, 7 months ago

Railway cha atmavrutta in Marathi​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

एक दिवस मी रेल्वेने प्रवास करत होतो. त्याच दिवशी मला रेल्वेची आतंरिक हाक ऐकू येऊ लागली. तिचे मनोगत मनाला पाझर फोडणारे होते. ती बोलू लागली, की तुम्ही मला वर्षानुवर्षे जीवदान देत आहेत. तुमच्या सहकार्यामुळे मी दिमाखात भारताच्या चारी दिशात बिनधास्त प्रवास करत आहे.मी धावत असताना अनेक राज्ये भेटतात. अनेक भाषा बोलणारे लोक भेटतात.राष्ट्रीय एकात्मता मी कटाक्षाणे जपते.भारतातील सर्व भाषेची लोक नियम व शिस्तीने वागतात. माझे नुकसान करत नाही. स्वच्छता पाळतात.माझा भयान अंधाऱ्या रात्री डोंगर, दऱ्या , नद्या, महासागरातून प्रवास चालू असतो. माझ्या दोन्ही बाजूनी हिरवीगार शेते असतात तर काही ठिकाणे उजाड वाळवंट.महासागरातून प्रवास करताना उंच लाटा माझे स्वागत करतात. ऊन, वादळ, पाऊस, थंडी किती ही असो मी तुमच्या सेवेत असते.मला माझ्या त्रासाची मुळीच तमा नसते.

आपल्या भारतात अनेक जाती, धर्माचे लोक ही असतात. त्यांच्या राष्ट्रप्रेमाच्या गप्पा ऐकून मला खूप बरे वाटते. गरीबांच्या सेवेसाठी मी जलद आणि स्वस्त प्रवास देते.आरामदायी प्रवास देण्यासाठी मी कटीबद्ध आहे.

कधी ,कधी तुमच्या सेवेतील तुमची अहोरात्र सेवेत असणारी मी संकटात सापडते.कधी, कधी माझा अचानक अपघात होतो तर कधी अचानक मी पेट घेते.भारतात जाती,धर्माच्या नावाखाली कुठेही दंगा, झाला तर माझ्यावर काही समाज कंटक हल्ला करतात.माझे जीवन उध्वस्त करतात .त्यामुळे तुमचे जनजीवन अस्ताव्यस्त करतात. याचा भुर्दंड तुमच्या सारख्या गरीब, निरपराध लोकांना वाढीव तिकिटाच्या स्वरुपात भरावा लागतो. माझ्या अंगावर दगडफेक करतात. कुणी तर मला जाळण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या ह्या दंगलीत आपलेच भाऊ, बहिणी मृत्यू पावतात. ते पाहिल्याने मला खूप दुःख होते.काही वेळा तर चोर,दरोडेखोर घुसतात.त्यावेळी मी भयकंपित होते. पण मी आता माझी सुरक्षा वाढवली आहे. माझ्या भारतीयांचा प्रवास सुरक्षित होत आहे. याचा मला अभिमान आहे. मी तुमची सेवा करत राहणार हे माझे वचन आहे.

वृद्ध माता, पिता यांच्यासाठी मी प्रवासात सवलत दिली आहे. सर्वांसाठी अन्न ,पाणी ह्या सर्व सोई केलेल्या आहेत. लहान मूल, आजारी व्यक्ती यांच्याकडे माझे विशेष लक्ष आहे. त्यांच्यासाठी यांत्रिक जिने तयार केले आहेत.इतर माझ्या बहिणी लोकल, मेट्रो च्या स्वरुपात सेवेत आहेत.आता तर मी जीवघेण्या प्रवासातून माझ्या लेकरांची सुटका करणार आहे. ठिक ठिकाणी छोट्या, मोठ्या शहरात माझ्या मेट्रो मित्रांना तुमच्या सेवेत पाठवणार आहेत.प्रवासात वाया गेलेला वेळ तुमच्या कुटुंबासाठी नक्कीच मिळेल. चला तर आता माझी व्यथा आणि खंत इथेच संपवते.

Explanation:

hope it helps you.....

Similar questions