rajarshi shahu maharaj speech short in marathi
Answers
Answer:
refer textbook or Google it out
■◆"राजर्षी शाहू महाराज" यांच्यावर भाषण:◆■
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व पाहूण्यांचे मी मनापासून स्वागत करतो.आज मी 'राजर्षी शाहू महाराज' यांच्यावर थोडं बोलू इच्छितो.
राजर्षी शाहू महाराज कोल्हापुर राज्याचे महाराजा होते.त्यांचा जन्म २६ जून,१८७४ रोजी झाला होता.
शाहू महाराज थोर समाजसुधारक होते.गोरगरीब आणि समाजातील मागासलेल्या लोकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली.आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येकाला शिक्षण आणि नोकरी मिळावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
त्यांनी मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.कोल्हापुरमध्ये बरेच होस्टल सुरु करून त्यांनी निम्न जातीच्या लोकांसाठी शिक्षणाची सुविधा सुलभ करून दिली.
त्यांनी बालविवाह वर रोक घातले,विधवा पुनर्विवाहला प्रोत्साहन दिले.कोल्हापुरच्या विकासामध्ये त्यांचा महत्वपूर्ण योगदान आहे.
अशा प्रकारे,शाहू महाराजांकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
धन्यवाद!