India Languages, asked by garimaupadhyay2750, 9 months ago

Ramaya te balpan मराठी निबंध 500 ते 600 शब्दांत​

Answers

Answered by manoj9588823131
0

Answer:

Life is a bundle of contradiction.... संवेदनशील मनाला या छोट्याशा वाक्यात पराकोटीची अगतिकता, घुसमट, दुःख जाणवेल. आयुष्यात वळणावळावर विरोधाभास समोर येतो. ज्या वेळी जे हवं असतं तेव्हा ते मिळत नाही आणि ते जेव्हा मिळतं तेव्हापर्यंत त्याचं महत्व, गरज संपलेली असते. मुलांच्या वाढदिवसाला आपण अनाथश्रमात कपडे, खेळणे भेट म्हणून देतो. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने आणि निरागस चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून हे एक निश्चितच स्तुत्य पाऊल आहे. पण एक विचार अचानक मनात डोकावून जातो की ज्या मुलांना आपण भेटवस्तु देतो त्या वेळी त्या मुलांना काय वाटत असेल ? आपलंही आयुष्य इतकं सुंदर, सुखी असतं तर? आपलेही आईबाबा असते तर? त्या आईबाबांसोबत आलेल्या मुलांच्या जागी आपण असतो तर? आपणही आपला वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला असता.छान शाळेत जाऊन खूप अभ्यास केला असता. आईबाबांसोबत गाडीतून फिरायला जाताना किती मजा आली असती. कपडे, खेळणे घेताना आईबाबांकडे हट्ट करता आला असता. पण नाही ना..... वास्तविकता खूप दारूण असते. जर तरचे विश्व हा केवळ आभास असतो.... क्षणभर कल्पनारंजन करून जे नाही ते आहे असं मनाला भासवून क्षणिक आनंद उपभोगण्यासाठी केलेला खटाटोप असतो.कमी वयात जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून न जाता कोवळ्या खांद्यावर ती जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज होणारे मुलं ‘बालपणीचा काळ सुखाचा' कसं म्हणू शकतील? खेळण्यांच्या दुकानात खेळणे विकणाऱ्या मुलांच्या डोळ्यांतील भाव आपल्याला खरंच वाचता येतात का? माँलमद्धे छोट्या मुलांना कार, बाईक्सवरून चक्कर मारून आणणाऱ्या मुलांजवळ त्यांच्या बालपणीच्या काय आठवणी असतील? सिग्नलवर भीक मागणारे उघडे नागडे मुलं, खेळता खेळता फुटपाथवरच फाटक्या फडक्यावर गाढ झोपी जाणारे मुलं आणि दुसरीकडे सिग्नलवर थांबलेल्या एसी गाडीच्या बंद काचेतून बाहेरची गंमत बघणारी मुलं .... पराकोटीचा विरोधाभास.आपण आपल्या मुलांना एक सुरक्षित आयुष्य देतो, त्यांच्या भोवती सुखाचं एक वलय निर्माण करतो. खाण्याच्या आवडीनिवडीपासून तर विविध जीवनसत्त्वयुक्त पदार्थ, फळं, सुकामेवा शिवाय इतर सप्लीमेंट्स आणि खूप काही. मग ऋतुबदलानुसार आहारात केलेले बदल .... सगळं कसं विचारपूर्वक आखलेलं. अशा आखणीपासून त्या मुलांनी का वंचित राहावं? निव्वळ प्रश्न, प्रश्न आणि निरूत्तरित प्रश्न. परमेश्वराने निदान प्रत्येकाला बालपण तरी रम्य, सुखी द्यावं जेणेकरून कुणाच्याही नशिबी विरोधाभास भोगण्याचं दुःख येणार नाही आणि खरंच बालपणीचा काळ सुखाचा होईल.विद्या सहदेव

Similar questions